शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रासायनिक गॅसगळती १८ ते २० जणांची प्रकृती खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 13:29 IST

A gas leak at Ambernath Chemical Company : या कंपनीत विविध रसायनांवर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. त्या प्रक्रियेदरम्यानच ही गॅसगळती झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ठळक मुद्दे अंबरनाथच्या आर के केमिकल्स कंपनीत वायूगळती झाल्याची माहिती समोर आली आहे.कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याची कबुली

अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील आर. के. केमिकल्स या कंपनीत आज सकाळच्या सुमारास अचानक गॅसगळती झाली. या गळतीमुळे शेजारील प्रेसफिट नावाच्या कंपनीतील १८ ते २० कामगारांना मोठा त्रास झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.             

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत आर. के. केमिकल्स नावाची कंपनी असून त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते. कंपनीत आज सकाळी नेहमीप्रमाणे डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना १० वाजताच्या सुमारास अचानक प्लँटमधला एक पाईप निसटला आणि त्यातून हवेत गॅस पसरला. हा गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत घुसला. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या १८ ते २० कामगारांना उलट्या, मळमळ, गुदमरणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कर्मचाऱ्यांनी केमिकलचा आम्हाला मोठा त्रास झाल्याचं सांगितलं.           

     

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल, शिवाजीनगर पोलीस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कंपनीच्याच निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची कबुली कंपन्यांची संघटना असलेल्या ऍडीशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच 'आमा' संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.  तर या कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.

टॅग्स :ambernathअंबरनाथhospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी