वाहने अडवून लूटमार करणारी टोळी नक्षलवाद्यासह अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:11 IST2025-10-18T11:10:58+5:302025-10-18T11:11:16+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात दरोडेखोर येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे अन्वेषण कक्षाचे पोलिस हवालदार संदीप भागरे यांना मिळाली होती. त्याच आधारे पथकाने सापळा रचून काही जणांना पकडले.

वाहने अडवून लूटमार करणारी टोळी नक्षलवाद्यासह अटकेत
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर शस्त्रास्त्राच्या धाकावर चालकांना, प्रवाशांना लुटण्याच्या तयारीतील राजेंद्र यादव (२७) या झारखंडच्या नक्षलवाद्यासह सहा जणांच्या टाेळीला मालमत्ता गुन्हे शाेध पथकाने अटक केली. अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पाेलिस आयुक्त डाॅ. पंजाब उगले यांनी शुक्रवारी दिली.
राजेंद्र यादव (२७), मोहम्मद अन्सारी (३६), अब्दुल रहीम अन्सारी (३०), सद्दाम अन्सारी (३०), शिवकुमार उराव (४०), अरविंद यादव (२१), अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेंद्र हा पूर्वी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले. तीन रिव्हाॅल्व्हरसह लुटीसाठीची सामग्रीही हस्तगत केली. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात दरोडेखोर येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे अन्वेषण कक्षाचे पोलिस हवालदार संदीप भागरे यांना मिळाली होती. त्याच आधारे पथकाने सापळा रचून काही जणांना पकडले.
जामीनावर सुटल्यानंतर नक्षली कारवायांत सहभाग
राजेंद्र हा पूर्वी नक्षलवादी कारवायांमध्ये होता. २०२२ मध्ये त्याला अटक झाल्यानंतर तो काही वर्षांनी जामिनावर सुटला; परंतु त्यानंतर त्याचा नक्षली कारवायांमध्ये सहभाग आढळून आला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.