नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल फोन टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी दिली आहे.
पेल्हार गावातील पेल्हार डॅम जवळ असलेल्या इंन्डस कंपनीचे मोबाईल फोन टॉवरच्या ५० हजार रुपये किंमतीच्या २४ बॅटऱ्या चोरट्यांने २३ नोव्हेंबरला पहाटे चोरी केल्या होत्या. २९ नोव्हेंबरला फिल्ड ऑफिसर अनुराग रामदिन शर्मा (२२) यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यात मोबाईल फोन टॉवरच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याने गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पथक यांना चोरी करणाऱ्या आरोपीचा छडा लावुन जेरबंद करण्यासाठी आदेश दिले होते.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाघचौरे, पोलीस उप निरीक्षक तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने तपास करुन गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप बोलेरो गाडीबाबत अधिक माहिती प्राप्त केली. त्यानुसार आरोपींची माहिती घेऊन आरोपी हे एआरसी कंपनीमध्ये (मोबाईल फोन टॉवर संबधीत) नोकरी करीत असल्याचे समजले. पेल्हार पोलिसांनी औरंगजेब सरवर अन्सारी (१९), परवेज गुलाम रसुल शहा (२४) आणि रफिक अमिनसाब शेख (३८) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीपसह ४ बॅटऱ्या व ४९ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त केली. तसेच मांडवी येथील दाखल गुन्ह्यातील ५२ हजारांच्या १३ बॅटऱ्या हस्तगत करुन २ गुन्हे उघडकीस आणले. पेल्हार पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून ६ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाघचौरे, पो उपनिरी तुकाराम भोपळे, सफौ योगेश देशमुख, पोहवा तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, अभिजीत नेवारे, रवि वानखेडे, अशोक परजणे, अनिल वाघमारे, वसिम शेख, अमोल मस्से यांनी केली आहे.
Web Summary : Police arrested a gang stealing mobile tower batteries in Nalasopara. The thieves stole batteries worth ₹50,000. Police recovered stolen goods worth ₹6.12 lakh, including a vehicle.
Web Summary : नालासोपारा में मोबाइल टावर की बैटरी चुराने वाले गिरोह को पुलिस ने गिरफ्तार किया। चोरों ने ₹50,000 की बैटरी चुराई। पुलिस ने एक वाहन सहित ₹6.12 लाख का चोरी का सामान बरामद किया।