भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST2021-09-15T04:46:40+5:302021-09-15T04:46:40+5:30

बदलापूर : शहरातील बेलवली भागात असलेल्या भुयारी मार्गात वर्षभर पाणी साचलेले असते. बेलवलीतील एका कुटुंबातील मृत व्यक्तीची अंत्ययात्रा ...

The funeral procession had to be pulled out of the knee-deep water in the subway | भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

बदलापूर : शहरातील बेलवली भागात असलेल्या भुयारी मार्गात वर्षभर पाणी साचलेले असते. बेलवलीतील एका कुटुंबातील मृत व्यक्तीची अंत्ययात्रा मंगळवारी या भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली. येथील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करून व लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलन करूनही भुयारी मार्गातील साठणाऱ्या पाण्याबाबत कुठलीच हालचाल केली गेली नाही. प्रशासनाला भुयारी मार्गाशी काहीही घेणे-देणे नसल्याचे पुन्हा निदर्शनास आले. बेलवली गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. भुयारी मार्गात पावसाळ्यात तसेच भुयारी मार्गालगत असलेल्या नाल्यातील पाणी पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात साचते. रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद करून बेलवली स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग काही महिन्यांपूर्वी संरक्षक भिंत घालून बंद केला. मात्र गावकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली नाही. त्यामुळे नगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन याठिकाणी पादचारी पुल उभारून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

............

वाचली

//////////फोटो

Web Title: The funeral procession had to be pulled out of the knee-deep water in the subway