शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

खंबाळपाड्यातील फुलमार्केट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 1:21 AM

विक्रेते फिरकलेच नाहीत : ग्राहकांना घ्यावी लागली कल्याणला धाव

डोंबिवली : पत्रीपुलावरील वाहतूककोंडी पाहता डोंबिवलीतील नागरिकांची सोय म्हणून गणेशोत्सवात येथील खंबाळपाडा परिसरात फुलमार्केट सुरू करण्याचे नियोजन केडीएमसीने केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यासाठी तात्पुरती जागाही देण्यात आली. पण चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे तेथे चिखल झाल्याने फूलमार्केट सुरू होऊ शकले नाही. परिणामी, नागरिकांना फुले व इतर पूजा साहित्य खरेदीसाठी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केट गाठावे लागले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न समितीमधील फुलमार्केटमध्ये फुले, पूजेचे साहित्य तसेच भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. मात्र, सध्या पत्रीपुलावरील वाहतूककोंडीचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. डोंबिवली व २७ गावांमधील ग्राहकांना फुलमार्केटला येताना या कोंडीचा सामना करावा लागू नये, म्हणून डोंबिवलीतच तात्पुरते फुलमार्केट सुरू करावे, असे पत्र सर्वपक्षीय युवा मोर्चाने केडीएमसीला दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी खंबाळपाडा येथील रिक्त भूखंड पूजेचे साहित्य, फुले, हार, भाजीपाला व सणासुदीच्या सामानाच्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिला होता. परंतु, तेथे मार्केट सुरू झाले नाही.

भूखंडावर चिखल निर्माण झाला आहे. तसेच ही जागा योग्य नसल्याने फुलविक्रे ते तेथे फिरकलेच नाहीत. त्या भूखंडावर शेड उभारण्यात आली. मात्र, फुलविक्रेतेच नव्हते. सोमवारी गणेशचतुर्थी असल्याने नागरिक रविवारी पूजा साहित्य तसेच फुले खरेदीसाठी खंबाळपाडा येथे आले असता त्यांची घोर निराशा झाली. यावर टेबल मांडून फुलविक्रेत्यांची व्यवस्था केली जाईल, रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही होईल, त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही, असा दावा फुलमार्केटसाठी पाठपुरावा करणारे सभापती दीपेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला होता.‘पावसामुळे प्रचंड गैरसोय’यासंदर्भात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे साहायक सचिव यशवंत पाटील म्हणाले की, पाऊस पडल्याने खंबाळपाड्यातील जागेवर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. तेथे बसण्यायोग्य जागाही नाही. त्यामुळे फुलमार्केटचे नियोजन करता आले नाही. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे