फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मुंब्य्रातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 23:58 IST2021-09-22T23:56:03+5:302021-09-22T23:58:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातून फरार असलेल्या फरार अब्दुल रजाक अब्दुल नबी मेमन (४९, रा. ...

Fugitive accused in fraud case arrested from Mumbai | फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मुंब्य्रातून अटक

उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

ठळक मुद्देउत्तर प्रदेश एटीएसची कारवाई एक लाखाचे होते बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातून फरार असलेल्या फरार अब्दुल रजाक अब्दुल नबी मेमन (४९, रा. मुंब्रा, ठाणे) याला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी रात्री मुंब्य्रातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर उत्तर प्रदेश सरकारने एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
अनेक वर्षांपासून फरार असलेला मेमन हा मुंब्रा परिसरात असून, त्याला पकडण्यासाठी मदतीची मागणी उत्तर प्रदेश एटीएसप्रमुखांनी महाराष्ट्राच्या एटीएस प्रमुखांकडे केली होती. या माहितीच्या आधारे हे पथक सोमवारी ठाण्यात आले होते. मुंब्रा ठाकूर पाडा येथील त्याच्या घरातील बाथरूमच्या पोटमाळ्यावरून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकांनी केली. आरोपीविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी झाली होती.

Web Title: Fugitive accused in fraud case arrested from Mumbai