शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणात आता ‘फुकट बाजार डॉट कॉम’

By admin | Updated: February 15, 2016 02:58 IST

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कुणावरही करावे’ या कवितेचे ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त आचरण करीत आयटी क्षेत्रातील दोन तरुण हर्षद गायकवाड आणि कासम शेख

डोंबिवली : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कुणावरही करावे’ या कवितेचे ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त आचरण करीत आयटी क्षेत्रातील दोन तरुण हर्षद गायकवाड आणि कासम शेख यांनी ‘फुकट बाजार डॉट कॉम’चा रविवारपासून प्रारंभ केला. यावर झालेल्या खरेदीतून होणाऱ्या नफ्यातील निम्मी रक्कम आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देऊन त्यांच्यावर प्रेम करा, असा संदेश उभयतांनी दिला आहे. हर्षद गायकवाड हा डोंबिवलीला राहतो, तर त्याचा मित्र कासम शेख हा कल्याणला राहतो. हर्षद हा पवई येथे आयटी कंपनीत कामाला आहे. कासम हा महापे येथील आयटी कंपनीत कामाला आहे. दोघेही आयटी क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी या दोघांनी नामी शक्कल लढविली आहे. हल्ली शहरी भागात प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने प्रत्येक जण आॅनलाइन असतो. साहजिकच, आॅनलाइन खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. या दोघांनी मिळून ‘फुकट बाजार डॉट कॉम’ सुरू केली आहे. तिचा प्रारंभ त्यांनी आज केला आहे. तिच्यासाठी कोणतीही अशी डेडलाइन त्यांनी आखून घेतलेली नाही. या फुकट बाजार डॉट कॉमवरून आॅनलाइन खेरदी केल्यास त्यातून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के नफ्यातून ग्राहकाला भेटवस्तू तर ५० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे. सध्या फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि शॉपलूज या आघाडीच्या डॉट कॉमवरून ग्राहक आॅनलाइन खरेदी करतात. या चारही वेबसाइटची लिंक फुकटबाजारवर दिली आहे. येथे खरेदी केल्यास त्यातून मिळणारा पैसा शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांसाठी काही मदतीचा हात द्यावासा वाटत असेल तर फुकट बाजारवरून काहीतरी खरेदी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कासम म्हणाला की, फुकट बाजारच्या आॅनलाइन खरेदीतून पाच लाख निधी जमविण्याचे लक्ष्य तूर्तास आम्ही समोर ठेवले आहे. निधी जमा झाल्यावर नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला देण्याचा विचार आहे.