Fraud of Rs 18 lakh by pretending to be a distributor of a financial company: Gang arrested | वित्तीय कंपनीचा वितरक असल्याचे भासवून १८ लाखांची फसवणूक: टोळी जेरबंद

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईसात लाख १३ हजारांचे मोबाईल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बजाज फायनान्स या कंपनीच्या अधिकृत डीलरचे आयडी आणि पासवर्डचा वापर करुन ओपन व्हर्च्युअल कार्ड वेगवेगळया ग्राहकांच्या नावाने बनवून त्याद्वारे १८ लाख ६१८ रुपयांचे मोबाईल खरेदी करुन फसवणूक करणाºया मोहम्मद अल्तामश याच्यासह तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख १३ हजारांचे 30 मोबाईल हस्तगत केले आहेत.
बजाज फायनान्स कंपनीचे ठाण्यातील वागळे इस्टेट येथे कार्यालय आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०२० या कालावधीत मुंब्रा येथील अल्तामश उनावाला याने बजाज फायनान्स कंपनीचा अधिकृत वितरक नसतांनाही अन्सार टॉवेलवाला (३५, रा. मुंब्रा, ठाणे) आणि दीपेन राजेंद्र सोमया (३१, रा. मुलुंड) यांच्या मदतीने ही फसवणूक केली. या टोळीने बजाज फायनान्स कंपनीचे राजस्थान, पंजाब, बिहार आदी राज्यातील अधिकृत डीलर यांचे लॉगीन आयडी तसेच पासवर्ड वापरून वेगवेळया ग्राहकांच्या नावाने ओपन व्हर्च्युअल कार्ड बनविले. याच कार्डच्या मदतीने या टोळक्याने तब्बल १८ लाख १८ हजार ६१८ रुपयांचे मोबाईल कर्जाने खरेदी करुन कंपनीची दिशाभूल केली. याप्रकरणी ठाण्यातील वागळे स्टेट पोलीस ठाण्यात कंपनी व्यवस्थापनाने १३ नोव्हेंबर २०२० रोजी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास वागळे इस्टेट पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, हवालदार आबुतालीब शेख, सुभाष मोरे, सुनिल जाधव आणि चंद्रकांत वाळूंज आदींच्या पथकाने या तिघांनाही १३ नोव्हेंबर रोजी मुंब्य्रातून अटक केली. त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. मोहम्मद अल्तामश हा बजाज फायनान्स कंपनीचा पूर्वाश्रमीचा डीलर होता. त्याच्याकडून विकलेल्या मोबाईलची कर्ज वसूली होत नसल्याने कंपनीने त्याची डीलरशीप काढून घेतली होती. त्यानंतर त्याने कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून आतापर्यंत सात लाखांचे विविध कंपन्यांचे ३० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

Web Title: Fraud of Rs 18 lakh by pretending to be a distributor of a financial company: Gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.