ठाण्यात चार वाहनांना आग, आगीच्या घटनेचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:01 IST2021-03-17T15:00:46+5:302021-03-17T15:01:10+5:30
ठाण्याच्या वागळे इस्टेस्ट, शिवाजीनगर परिसरात असलेल्या ज्योतिलिंग सोसायटी, रतन भाई कंपाऊंड येथील रस्त्यावर चार दुचाकी वाहने उभी केली होती.

ठाण्यात चार वाहनांना आग, आगीच्या घटनेचा तपास सुरू
ठाणे: रस्त्यावर उभ्या केलेल्या चार दुचाकी वाहनांना आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे ठाण्यातील वागळे इस्टेस्ट परिसरात घडली. या आगीत ती चारही वाहने जळून खाक झाली असून आगीचे कारण मात्र अद्यापही समजू शकलेले नाही.
ठाण्याच्या वागळे इस्टेस्ट, शिवाजीनगर परिसरात असलेल्या ज्योतिलिंग सोसायटी, रतन भाई कंपाऊंड येथील रस्त्यावर चार दुचाकी वाहने उभी केली होती. त्या वाहनांना बुधवारी पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती समजताच ठाणे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी १ फायर इंजिन, १ क्यूआरव्ही वाहन पाचारण केले होते. त्यांनी घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले. आग आटोक्यात येईपर्यंत चारही दुचाकी वाहने जळून खाक झाली होती. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. ही आग लागली की लावण्यात आली हे अद्यापही समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस शोध घेत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.