ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह पाच जणांविरुद्ध चार कोटींच्या खंडणीचा गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Published: July 24, 2021 12:07 AM2021-07-24T00:07:53+5:302021-07-24T00:14:25+5:30

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त तथा गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंग तसेच तत्कालीन गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनामिया, सुनिल जैन आणि मनोज घोटकर या पाच जणांविरु द्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार कोटी ६८ लाखांच्या खंडणीप्रकरणी शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.

Four Thane police commissioner Paramveer Singh and five others were charged with ransom of Rs 4 crore | ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह पाच जणांविरुद्ध चार कोटींच्या खंडणीचा गुन्हा

मुंबई पाठोपाठ ठाण्यातही तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात गुन्हामुंबई पाठोपाठ ठाण्यातही तक्रार चक्क शासकीय निवासस्थानातच खंडणी स्वीकारल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई आणि ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त तथा गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंग तसेच तत्कालीन गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनामिया, सुनिल जैन आणि मनोज घोटकर या पाच जणांविरु द्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार कोटी ६८ लाखांच्या खंडणीप्रकरणी शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतही अशाच प्रकारचा गुन्हा सिंग यांच्यासह आठ जणांविरुद्ध मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे सिंग यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
भार्इंदर येथील रहिवाशी असलेल्या शरद अग्रवाल (३७) यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यांच्याकडून दोन कोटींची रोकड आणि दोन कोटी ६८ लाख रुपये धनादेशाद्वारे उकळल्याचा आरोप या तक्रारीमध्ये आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोपरीतील बारा बंगला परिसरातील पोलीस आयुक्त यांच्या निवासस्थानीच ही खंडणी उकळल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. परमबीर सिंग हे ठाण्याचे आयुक्त असताना मणेरे नेरे हे त्यावेळी अन्वेषण विभागाचे उपायुक्त होते. नोव्हेंबर २०१६ ते मे २०१८ या कालावधीमध्ये हा प्रकार घडल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय पुनामिया त्याचे साथीदार सुनिल जैन, मनोज घोटकर, उपायुक्त मणेरे आणि परमवीर सिंग यांनी कटकारस्थान तसेच आपसात संगनमताने शरद अग्रवाल आणि त्यांचा भाऊ शुभम यास खोटया पोलीस केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दोन कोटींची रोकड उकळली. त्याचवेळी भार्इंदर येथील शरद यांची आई द्रौपदीदेवी यांच्या नावे आठ कोटींच्या बाजारभावाने असलेली जमीन केवळ एक कोटींमध्ये खरेदी केल्याचे खत बनवून खंडणीद्वारे जबरदस्तीने घेतले. तसेच शरद यांचे चुलते श्यामसुंदर अग्रवाल यांनाही मोक्काच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडूनही दोन कोटी ६८ लाखांची सिन्नर (नाशिक) येथील जमीन डीड आॅफ सेटलमेंट बनवून त्यात श्यामसुंदर यांचे हक्क स्वत:च्या नावाने जबरदस्तीने खंडणी म्हणून घेतले. अशी त्यांनी चार कोटी ६८ लाखांची रक्कम त्याचबरोबर जमिनीचे दोन भूखंड शरद आणि त्यांचे चुलते श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडून जबरदस्तीने खंडणीच्या स्वरुपात घेतल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
* विशेष म्हणजे शरद यांचे चुलते बिल्डर श्यामसुंदर यांनी मुंबईतही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याआधी, परमबीर सिंह तसेच उपायुक्त अकबर पठाण यांच्यासह आठ जणांविरुद्ध करोडोंची खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल केला आहे.
* बिल्डर श्याम अग्रवाल हे मीरा भार्इंदर मधील यूएलसी घोटाळयातील कथित आरोपी असून यात त्यांना अटकही झाली होती. याच गुन्हयात त्यांना मोक्का लावण्याची भीती दाखवित तसेच त्यांना या गुन्हयातून बाहेर काढण्यासाठी त्यांचा पुतण्या शरद अग्रवाल यांच्याकडूनही त्यांनी खंडणी उकळली. ही खंडणीची रक्कम उकळण्यासाठी परमवीर सिंग यांनी ठाण्यातील बारा बंगला येथील शासकीय निवासस्थान आणि मरीन ड्राइव्ह येथील निवासस्थानाचाही वापर केल्याचा आरोप आहे.
*ठाणे पोलिसांकडून कमालीची ‘गोपनियता’
तब्बल तीन वर्षांनी आपल्याच माजी पोलीस आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागल्याची नामूष्की ओढवल्याने ठाणे पोलिसांनी मात्र कमालीची ‘गोपनीयता’ बाळगली आहे.
कोपरी पोलिसांनी वरिष्ठांकडून ही माहिती मिळेल, असे सांगितले. तर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवर माहिती देण्यास नकार दिला. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या एका अधिकाºयाने असा गुन्हा दाखल झाल्याचे मान्य केले.

Web Title: Four Thane police commissioner Paramveer Singh and five others were charged with ransom of Rs 4 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.