सेनेचे माजी आमदार दरोडा राष्ट्रवादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 01:23 IST2019-10-01T01:20:50+5:302019-10-01T01:23:06+5:30

अनेक पक्षांतील बड्या नेत्यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला असताना, शहापुरातील शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बंडाचा झेंडा उभारला आहे.

Former Sena MLA Daulat Dhoroda join NCP | सेनेचे माजी आमदार दरोडा राष्ट्रवादीत

सेनेचे माजी आमदार दरोडा राष्ट्रवादीत

भातसानगर : अनेक पक्षांतील बड्या नेत्यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला असताना, शहापुरातील शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बंडाचा झेंडा उभारला आहे. शहापूर मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनावासी झाले. आता शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे उपस्थित होते.

गेली २५ वर्षे शिवसेनेसाठी काम केलेले व तीनवेळा शहापूर विधानसभेचे आमदार असलेले दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यात ६५ टक्के बिगर आदिवासी समाज असून, हा समाज आता कोणाच्या मागे उभा राहतो, हे आता पाहायला मिळणार आहे.

दरोडा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास तालुक्यात या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे.

Web Title: Former Sena MLA Daulat Dhoroda join NCP