शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2024 17:42 IST

महाआघाडीकडून तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली.

सदानंद नाईक, उल्हासनगर: माजी आमदार पप्पु कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन, विधानसभा उमेदवारांबाबत चर्चा केली. यावेळी पक्षनेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. महाआघाडीकडून तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली.

 उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी या समीकरणाला भाजपचे कुमार आयलानी यांनी छेद दिला असलातरी. एकूणच शहरातील राजकारण कलानी कुटुंबा भोवती फिरत असल्याचे चित्र आहे. लोकसभेला कलानी कुटुंबानी दोस्ती या गोंडस नावाखाली महायुतीचे मात्र शिंदेंसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात उतरले होते. तर इतरत्र लोकसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणूक पार पडताच कलानी कुटुंबांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली. माजी आमदार पप्पु कलानी यांनी ३४ वर्षानंतर काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेट घेतली होती. दरम्यान रिपाइं आठवले गटातून हक्कालपट्टी झालेले जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन तुतारीवर उभा राहणार असल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाला होता. माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.  कलानी कुटुंबाकडून पप्पु कलानी ऐवजी ओमी कलानी निवडणूक रिंगणात उतरणार असून शरद पवार यांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात होते. महाविकास आघाडीकडून ओमी कलानी हे तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या महिन्यात शरद पवार यांची सभा उल्हासनगरात ठेवण्याचे संकेतही कलानी यांनी दिले.

 कलानी गटात उत्साह कलानी कुटुंबानी समर्थकासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी भेट घेतल्यानंतर, कलानी समर्थकांत उत्साहाचे चित्र आहे. त्यांनी प्रचाराचे नारळ यापूर्वीपासूनच फोडले आहे. *ठाकरे सेना व काँग्रेसचा पाठिंबा? महाविकास आघाडीकडून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एकमेव कलानी कुटुंबाचे नाव पुढे आहे. शहर ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कलानी यांच्या नावाला मुकसंमती दिल्याचे बोलले जात आहे. *भाजपचे आयलानी यांची कोंडी? भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्यासह पक्षातील ३ ते ४ जण इच्छुक आहेत. तसेच शिंदेंसेनेचे राजेंद्र चौधरी यांनीही दंड ठोठावले आहे.

 एकूणच आयलानी कोंडीत सापडले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारulhasnagarउल्हासनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस