लूकआऊट नोटीसमुळे माजी आमदार मेहतांना परदेशात जाण्यापासून खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:59 AM2021-08-26T00:59:31+5:302021-08-26T01:03:34+5:30

भाजपच्या एका नगरसेविकेने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये लूकआऊट नोटीस असल्यामुळे मीरा भार्इंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना बुधवारी इमिग्रेशन विभागाने मालदीवला जाण्यापासून रोखले. त्यानंतर ठाणे पोलिसांनीही त्यांची चौकशी केली.

Former MLA Mehta barred from going abroad due to lookout notice | लूकआऊट नोटीसमुळे माजी आमदार मेहतांना परदेशात जाण्यापासून खोळंबा

इमिग्रेशन विभागाने घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्दे इमिग्रेशन विभागाने घेतले ताब्यातठाणे पोलिसांनी केली चौकशी

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाजपच्या एका नगरसेविकेने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये लूकआऊट नोटीस असल्यामुळे मीरा भार्इंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना बुधवारी इमिग्रेशन विभागाने मालदीवला जाण्यापासून रोखले. त्यानंतर ठाणे पोलिसांनीही त्यांची चौकशी केली. त्यामुळेच फिरायला जाण्याच्या मूडमध्ये असलेल्या मेहतांची पंचाईत झाली.
मेहता यांच्याविरु द्ध त्यांच्या एकेकाळच्या मैत्रिणीने सुमारे दीड वर्षापूर्वी मीरा रोड पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडे होता. मीरा भार्इंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर हे प्रकरण ठाणे शहर पोलिसांकडे गृह विभागाने वर्ग केले. याच गुन्ह्यात मेहता यांच्याविरु द्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली होती. मेहता हे कुटुंबीयांसह 25 आॅगस्ट 2021 रोजी दुपारी मालदीवला जाण्याच्या बेतात होते. त्यांनी परतीच्या फ्लाईटचेही तिकीट आरिक्षत केले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी आधीच काढलेल्या लूकआऊट नोटीसमुळे इमिग्रेशन विभागाने त्यांना विमानतळावरच रोखले. त्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाला देण्यात आली. त्याच आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी त्यांची विमानतळावरच चौकशी केली. या चौकशीमध्ये फिरायला जाण्यासाठी परदेशी (मालदीवला) जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, चौकशीला संपूर्णपणे पोलिसांना सहकार्य करणार असल्याची हमीही त्यांनी दिली. शिवाय, याच गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला असल्याने अटक न करण्याचेही न्यायालयाचे निर्देश असल्याची कागदपत्रेही पडताळण्यात आली.
...तर त्यांना रोखले नसते
अर्थात, पोलिसांना यासंदर्भातील माहिती मेहतांनी आधीच दिली असती तर त्यांना कदाचित रोखण्यात आले नसते. आता 25 ऐवजी 26 आॅगस्टला ते पुन्हा मालदीवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याविरु द्धच्या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Former MLA Mehta barred from going abroad due to lookout notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.