काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी भाजपात; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 20:10 IST2022-04-25T20:09:52+5:302022-04-25T20:10:27+5:30
चंद्रकांत मोदी मीरारोडमधून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून पूर्वी निवडून आले होते.

काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी भाजपात; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत केला प्रवेश
मीरारोड - मीरा भाईंदर काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी यांनी आज सोमवारी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला.
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष एड. रवी व्यास, नगरसेवक सुरेश खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते.
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले, माजी खा. शिवाजीराव माने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत मोदी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई येथे पक्ष कार्यालयात या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले.#BJP#Maharashtrapic.twitter.com/syW6iV2LiT
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 25, 2022
चंद्रकांत मोदी मीरारोडमधून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून पूर्वी निवडून आले होते. त्यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला धक्का मानला जात आहे.