शाहपूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात जातिवाचक शिविगाळीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 02:34 IST2020-03-16T02:34:16+5:302020-03-16T02:34:31+5:30

भोईर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार बरोरा यांनी जाती वाचक शिवीगाळ करून माझ्या कानशिलात एक लगावली अशी तक्रार दाखल केली असून, तपास हवालदार परदेशी करत आहेत.

Former caste complaint against Pandurang Barora, Shahpur | शाहपूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात जातिवाचक शिविगाळीची तक्रार

शाहपूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात जातिवाचक शिविगाळीची तक्रार

शहापूर -  शहापुरचे आमदार दौलत दरोडा याचें खाजगी स्वीय साहाय्यक  प्रशांत  सुरेश भोईर यांनी  आज शहापूर पोलिस ठाण्यात  माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे विरोधात जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार नोंदवली असल्याने शहापुरात चर्चेचा विषय झाला.

आज तालुक्यातील पेंढारघोळ  येथे सह्याद्री आदिवासी म. ठाकूर संघटनेचे अध्यक्ष जानू हिरवे यांच्या मुलीचा विवाह समारंभ होता. या समारंभास आमदार दरोडा यांचे खाजगी स्वीय सहाययक प्रशांत भोईर यांनाही निमंत्रण होते. भोईर हे वधुवरास शुभेच्छा देऊन बाहेर निघत असताना गेट पाशी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचेशी गाठभेट झाली. तेथे भोईर आणि बरोरा यांच्यात शाब्दिक बाचाबाची  होऊन प्रकरण जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत गेले, असे स्वीय सहाययक भोईर यांचे म्हणणे आहे. या  संदर्भात माजी आमदार बरोरा यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही.

दरम्यान भोईर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार बरोरा यांनी जाती वाचक शिवीगाळ करून  माझ्या कानशिलात एक लगावली अशी तक्रार दाखल केली असून, तपास हवालदार परदेशी करत असून, आद्यप काही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.

Web Title: Former caste complaint against Pandurang Barora, Shahpur