ढोल ताशा पथकामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून सोनसाखळीची जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 20:56 IST2020-12-08T20:54:55+5:302020-12-08T20:56:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ढोल ताशा पथकामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून कुणाल पेडणेकर या १६ वर्षीय तरुणाकडील सोनसाखळीची ...

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ढोल ताशा पथकामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून कुणाल पेडणेकर या १६ वर्षीय तरुणाकडील सोनसाखळीची एका भामटयाने जबरी चोरी केल्याची घटना शनिवारी इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबिकानगर क्रमांक दोन येथे राहणाऱ्या कुणाल याला ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एका २५ ते ३० वर्षीय भामटयाने ढोलताशा पथकातील वर्तुळामध्ये झेडा फिरविण्याचे काम देतो, असे अमिष दाखविले. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करुन त्याला वागळे इस्टेट, इंदिरानगर नाका येथे नेले. नंतर त्याच्या गळयातील २५ हजारांची नऊ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरीने खेचून जवळच्याच एका गल्लीतून पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ हे अधिक तपास करीत आहेत.