शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

त्या रुग्णांलयांच्या बाहेर पालिकेने लावले दर पत्रकांचे फ्लेस्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:05 IST

अवाजवी दर लावून वसुली करणाºया खाजगी रुग्णांलयांच्या ठिकाणी आता पालिकेने फ्लेक्स लावले आहेत. त्यानुसारच आता दर आकारणी करावी, त्याअनुषंगानेच बिल अदा केले जावे अशा सुचना पालिकेने दिल्या आहेत.

ठाणे : कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी रूग्णालय व्यवस्थापनांकडून महापालिकेने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी बिल वसूल करत असल्याच्या तक्र ारीची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी अवाजवी बिल वसुल करणाºया खासगी रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची अडवणूक टाळण्यासाठी परिमंडळ स्तरावर समिती गठित केली आहे. तर पालिकेने जे दर निश्चित केले आहेत, त्याचे दरपत्रकच पालिकेने आता त्या खाजगी रुग्णांलयांच्या लावण्यात आले आहेत.            त्या त्या परिमंडळाचे उपायुक्त हे त्या समितीचे अध्यक्ष असून वैद्यकिय आरोग्य अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी, प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष किंवा सचिव आणि संबंधित रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी आदींचा या समितीमध्ये समावेश आहे. दरम्यान आता महापालिकेच्या माध्यमातून जे दर निश्चित करण्यात आले आहेत, त्यांचे फ्लेक्स हे त्या त्या रुग्णालयांच्या बाहेर लावण्यात आले आहेत. त्यानुसारच रुग्णालय व्यवस्थापनाने दर आकारावेत असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच रुग्णांना देखील त्यानुसारच बिल द्यावे असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी रु ग्णाकडून प्रतिदिन चार हजार, त्यात बेड चार्जेस, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. शेअरींग कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन पाच हजार, तर स्वतंत्र कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन सात हजार रु पये आकरले जाणार आहेत. त्यात रु ग्ण खोली, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. तर अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दहा हजार रु पये आकारले जाणार असून व्हेंटीलेटरसाठी अतिरिक्त प्रतिदिन दोन हजार रु पये आकारले जाणार आहेत. प्रत्यक्ष वापरात आलेली औषधे आणि सर्जिकल साहित्याचा खर्च यामध्ये बाजारभावापेक्षा १५ टक्के कमी दराने आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्शुअर्ड रु ग्ण तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा रु ग्णांकडून नेहमीच्या दराने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय पालिकेने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचारासाठी सुविधाही दिली आहे. परंतु या नुसार दर आकारले गेले नाहीत, जास्तीचे दर आकारले गेले तर संबधींत रुग्णालयावर कारवाई केली जाईल असा इशाराही पालिकेने दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल