भातसा धरणाचे ५ दरवाजे उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:17 IST2018-08-21T18:16:52+5:302018-08-21T18:17:25+5:30
धरण क्षेत्रात पावसास परत सुरुवात झाली असून भातसा धरणाचे एकूण ५ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे

भातसा धरणाचे ५ दरवाजे उघडले
ठाणे - धरण क्षेत्रात पावसास परत सुरुवात झाली असून भातसा धरणाचे एकूण ५ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. भातसा परिसरात १ जूनपासून आत्तापर्यंत १८६७ मिमी पाउस झाला आहे.
आज पहाटे प्रारंभी धरणाचे १,३,५ क्रमांकाचे तीन दरवाजे २५ सेंमी ने उघडण्यात आले. यातून ६८.६७ क्युमेक्स इतका विसर्ग सुरु होता . दुपारी ३.३० नंतर वाढलेला वेग लक्षात घेऊन २ व ४ या क्रमांकाचे दरवाजे देखील ०.२५ मी ने उघडण्यात आले. सध्या ११६.१७५ क्युमेक्स असा विसर्ग सुरु आहे अशी माहिती अभियंता योगेश पाटील यांनी दिली. सापगाव पुलाच्या खाली पाणी पातळी २.४० मीटर इतकी झाली असून पुलाच्या खालील बाजूस लागेल इतके पाणी झाले आहे. तहसीलदार, सरपंच तसेच इतर यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीत सावध ठेवण्यात आले आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.
सध्या बारवी धारण १०० टक्के भरले असून पाण्याची पातळी ६८.८८ मीटर झाली आहे. मोडकसागर १०० टक्के, तानसा ९९.८३ टक्के भरले आहेत.