ठाणे जिल्ह्यात प्रथमच शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रुग्ण सापडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 21:08 IST2021-11-05T21:07:54+5:302021-11-05T21:08:28+5:30
कोरोनाच्या कालावधीपासून प्रथमच ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रूग्ण सापडले आहेत.

ठाणे जिल्ह्यात प्रथमच शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रुग्ण सापडले!
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवाळीचा पाडवा पावला. कोरोनाच्या कालावधीपासून प्रथमच ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रूग्ण सापडले आहेत. या रुग्णं वाढीसह शुक्रवारी केवळ दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे पालिका परिसरात २९ रुग्णांच्या वाढ झाली. तर कल्याण डोंबिवलीला दहा रुग्ण वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. नवी मुंबईत १६ रुग्णांची वाढ होऊन एक मृत्यू.उल्हासनगरमध्ये एकही रुग्ण नाही. भिवंडीत एक रुग्ण सापडला आणि मीरा भाईंदरला १४ रुग्णांची वाढ झाली आहे. अंबरनाथला दोन रुग्ण वाढले आहेत. बदलापूरमध्ये तीन रुग्णांची आज वाढ होऊन जिल्ह्यातील गांवपाड्यात सात रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.