शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आधी धरण, मग नदीचे रुंदीकरण

By admin | Updated: March 29, 2017 05:27 IST

मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याच नदीवर पेंढरी येथे ११ कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. या धरणाच्या जमीनमोजणीचे काम पूर्ण झाले असून, यासाठी लाखो रुपये खर्चसुद्धा झाले आहेत. परंतु, धरणाच्या बांधावर टोपलेभर मातीदेखील पडली नसताना या नदीचे रुंदीकरण करून ठराविक अंतरावर सिमेंट काँक्रिटचे बंधारे बांधण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयाला पेंढरी धरण संघर्ष समितीने प्रखर विरोध केला असून, प्रथम कमी खर्चात होणारे धरण बांधा, नंतर कनकवीरा नदीचे खोलीकरण आणि सिमेंट काँक्रि टचे बंधारे बांधा, असा निर्णय घेतला आहे. तसे पत्र परिसरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीने शिवसेना नेते सुभाष घरत व पी.एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. तसेच आमदार किसन कथोरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांनादेखील निवेदने देण्यात आली आहेत.कनकवीरा नदीवर पेंढरी येथे धरणाचे बांधकाम करावे, असा प्रस्ताव माजी मंत्री कै. शांतारामभाऊ घोलप यांनी १९७७ मध्ये मांडला होता. मात्र २०११ मध्ये याला प्रथम प्रशासकीय मान्यता मिळून २०१३ मध्ये या धरणाचे ११०० कोटींचे टेंडर मंजूर करण्यात आले. हे काम मे. तुळजा गजानन कन्ट्रक्शन नाशिक या एजन्सीला देण्यात आले आहे. धरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या असून जमिनीची मोजणी झालेली आहे. यासाठी ठेकेदाराने लाखो रुपये खर्च केले आहेत. हा शासनाचा खर्च असूनही ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नद्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील कनकवीरा नदीची निवड करून यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील ११ गावांची सिंचन क्षमता वाढून ५०० हेक्टरपेक्षा जास्त वाढणार आहे. या योजनेस परिसरातील शेतकरी व पेंढरी धरण संघर्ष समितीचा विरोध नाही. ही योजना जिल्हाधिकाऱ्यांनी जरूर राबवावी. परंतु, ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पेंढरी धरणाचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा. (वार्ताहर)