शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मीरारोड रेल्वे स्थानकातील निर्माणाधीन तिकीट घराच्या इमारतीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 1:19 PM

अंधेरी येथील रेल्वे मार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेपाठोपाठ मीरारोडच्या तिकीट घरचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मीरा रोड - अंधेरी येथील रेल्वे मार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेपाठोपाठ मीरारोडच्या तिकीट घरचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला चर्चगेटच्या दिशेकडे जुने तिकीट घर आहे. सदर तिकीट घराच्या मागील बाजूस नवीन एक मजली तिकीट घराचे काम सुरू आहे. सदर निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्यावर पीव्हीसी पाईप ठेवण्यात आले होते. सकाळी ८.४०च्या सुमारास या पाईपना आग लागली. पीव्हीसी पाईपने पेट घेताच मोठ्या प्रमाणात धूर व ज्वाळा उसळल्या. यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशी व परिसरातील नागरिकांमध्ये घबराट माजली. तेथील रेल्वेचे कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर तिकीट घरात असलेल्या अग्निशामक यंत्राने आग विझवण्यात आली. आग काही वेळातच विझवण्यात आल्याने बऱ्याच पाईपचे नुकसान टळले.  या आगीची वर्दी पालिकेच्या अग्निशमन दलाकडे नव्हती. सोशल मीडियावर आगीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या पाईपना आग चुकून लागली की लावली हे स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :mira roadमीरा रोडfireआग