शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खडी खदान डम्पिंगची आग अजूनही धुमसतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

उल्हासनगर : खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासांपासून प्रयत्न करीत आहेत. ...

उल्हासनगर : खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासांपासून प्रयत्न करीत आहेत. आगीने कॅम्प नं ५ परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंडवर उंचच उंच कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून महापालिका पर्यायी डम्पिंग जागेच्या शोधात आहेत. दरम्यान बुधवारी सायंकाळी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आग लागल्याने परिसरात आगीने धुराचे साम्राज्य निर्माण झाले. महापालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी डम्पिंग ग्राउंडकडे धाव घेऊन आगीचा आढावा घेतला. अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासांपासून डम्पिंगला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग आटोक्यात केव्हा येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

महापालिकेने गेल्या महिन्यात डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे सपाटीकरण करण्याचा ठेका खासगी कंपनीला देऊन जेसीबीसह अन्य मशीन घेण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यावर ७५ लाखांचा जास्तीचा खर्च महापालिका करणार आहे. एकीकडे शहरातील कचरा उचलणे, डम्पिंगवरील कचऱ्याचे सपाटीकरण करणे, शहरातील डेब्रिज उचलणे आदींवर कोट्यवधींचा खर्च करूनही कचऱ्याचा प्रश्न जैसे थे आहे. महाशिवरात्रीमध्ये कचऱ्याचे ढीग साचू नये म्हणून डम्पिंगला आग लागलेली असतानाही कचरा उचलण्याचे काम कोणार्क कंपनीने सुरू ठेवले आहे. एकूणच कचऱ्याच्या नावाने काहीजण स्वतःचे चांगभले करून घेत असल्याची टीका सर्वत्र होत आहे.

डम्पिंगवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध

खडी खदान येथे कचरा टाकण्यास पहिल्या दिवसांपासून स्थानिक नागरिक व नगरसेवक विरोध करीत आहेत. येथील डम्पिंग हटविण्यासाठी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, उपोषण, महासभेत आंदोलन करून विरोध दर्शविला. डम्पिंगवरील कचऱ्याच्या आगीने विरोध तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.