फर्निचर दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 21:01 IST2018-12-06T20:51:48+5:302018-12-06T21:01:45+5:30
घोडबंदर येथील विजय गार्डन रोडवर असलेल्या फर्निचर दुकानाला आणि काचेच्या दुकानाला अचानक आग लागली

फर्निचर दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
ठाणे - शहरातील घोडबंदर येथे एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीचे वृत्त समजाच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून स्थानिकांकडूनही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
घोडबंदर येथील विजय गार्डन रोडवर असलेल्या फर्निचर दुकानाला आणि काचेच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील काही सामान जळाले आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Maharashtra: Fire breaks out in a furniture shop near Muchhala College, Ghodbunder Road, Thane (W). Fire tenders are present at the spot. More details awaited. pic.twitter.com/tvCwIXAQbK
— ANI (@ANI) December 6, 2018