Video : ठाण्यातील MSEDC पॉवर हाऊसमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 02:32 IST2018-10-01T01:49:03+5:302018-10-01T02:32:36+5:30
शहरातील MSEDC पॉवर हाऊसमध्ये भीषण आग लागली आहे.

Video : ठाण्यातील MSEDC पॉवर हाऊसमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या हजर
ठाणे - शहरातील सावरकर नगरमधील MSEDC पॉवर हाऊसमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्याकडून आग आटोक्यात आणण्यात येत आहे. आग मोठी असल्याने जाळ अन् धूर पसरल्याचे दिसत आहे. तर, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेत कुठलिही जिवितहानी झाली नसून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
#SpotVisuals: Fire breaks out in MSEDC power house at Savarkar Nagar, Thane. 4 fire tenders at the spot. Fire extinguishing operation underway. #Maharashtrapic.twitter.com/leKjW3josc
— ANI (@ANI) September 30, 2018
पाहा व्हिडीओ -