बँकेच्या 2 अधिकाऱ्यांकडूनच 17 लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 10:51 PM2018-08-05T22:51:47+5:302018-08-05T22:52:52+5:30

शहरातील नवजीवन बँकेतील दोन अधिकाऱ्यांनी मुदत ठेव व आवर्ती ठेवीचे 17 लाख 4 हजार 266 रुपये बँकेत जमा न करता अपहार केला. याप्रकरणी

FIR registered against two bank officials in ulhasnagar | बँकेच्या 2 अधिकाऱ्यांकडूनच 17 लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

बँकेच्या 2 अधिकाऱ्यांकडूनच 17 लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

Next

उल्हासनगर : शहरातील नवजीवन बँकेतील दोन अधिकाऱ्यांनी मुदत ठेव व आवर्ती ठेवीचे 17 लाख 4 हजार 266 रुपये बँकेत जमा न करता अपहार केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

उल्हासनगर येथे नवजीवन बँकेच्या अनेक शाखा असून कॅम्प नं-3 येथील बँक शाखेत कानयो घनयानी व श्रुती मोरे कनिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 20 सप्टेंबर 2015 ते 13 जुलै 2018 च्या दरम्यान दोघांनीही मुदत व आवर्ती ठेवेची 17 लाख 4 हजार 266 रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्याऐवजी अपहार करून बॅंक व ग्राहकांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांनाही बँकेने निलंबित केले असून बँक अधिकारी गिरीधर हरगुणांनी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही बँकेतील अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाली आहेत.

Web Title: FIR registered against two bank officials in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.