शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती

By जितेंद्र कालेकर | Updated: July 30, 2018 22:29 IST

परमवीर सिंग यांची अपर महासंचालक कायदा सुव्यवस्था म्हणून महासंचालक कार्यालयात बदली झाली असून ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.

ठळक मुद्देपरमवीर सिंग यांच्याकडे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारीसोमवारी दुपारी आले आदेशमंगळवारी सूत्रे स्वीकारणार

ठाणे : अखेर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बहुचर्चित बदली झाली असून सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास यासंदर्भातले अधिकृत आदेश गृहविभागाने काढले. त्यांच्याकडे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची (अपर महासंचालक) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.रविवारी दिवसभर पोलीस आयुक्त सिंग यांच्या बदलीची चर्चा असतांना सोमवारीही ते आपल्या बदलीच्या आदेशाच्या प्रतिक्षेत होते. मुळात, ठाण्यातून थेट मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागेल, अशी अपेक्षा सिंग यांना होती. मात्र, तिकडे अगदी अखेरच्या क्षणी सेवाजेष्ठतेमध्ये सिंग यांच्यापेक्षा तीन वर्षांनी वरिष्ठ असलेल्या सुबोध जैसवाल यांची केंद्रातून (रॉ) थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यामुळे सिंग हे काहीसे नाराज होते. त्यानंतर ठाण्यातच आहे त्याठिकाणी आयुक्तपदी मुदतवाढ मिळेल, अशीही एक चर्चा होती. पण, महिनाभरातच त्याही चर्चेला पूर्णविराम मिळाला. आणि एकेकाळी ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेले फणसाळकर यांची आता थेट आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.१९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले फणसाळकर हे अतिरिक्त महासंचालक म्हणून नववे तर ठाण्याचे २२ वे आयुक्त म्हणून ते पदभार घेतील. ठाण्यात २००८ ते २०१० या कालावधीत ते ठाणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते. त्यानंतर त्यांची ठाण्यातून मुंबई पोलीस आयुक्तालयात वाहतूक शाखेच्या सह आयुक्तपदी बदली झाली. मुंबईच्या वाहतूक शाखेत त्यांनी चांगला दबदबा निर्माण केला होता. वाहतूक नियम मोडणाऱ्या पोलिसांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. यातून राजकीय नेत्यांचीही सुटका झाली नव्हती. पुढे मुंबई आयुक्तालयातच त्यांनी प्रशासन सह आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळला. त्यानंतर राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात (अतिरिक्त महासंचालक) आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही कणखरपणे जबाबदारी सांभाळली. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात. राज्यात मुंबई पाठोपाठ ठाण्याचे पोलीस आयुक्तपद प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे फणसाळकर ठाण्यातील गुन्हेगारीचा आकडा कमी करण्यात काय बदल घडवून आणतात, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे........................................ठाणेकरांचे सहकार्य लाभले- परमवीर सिंगगेल्या तीन वर्षात ठाणेकरांचे चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे अनेक गुन्हे उघड करता आले. आपल्या कार्यकाळात अनेक गुन्हयांमध्ये घट आणल्याचेही मावळते पोलीस आयुक्त परमवीर सिंग म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली