शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

अखेर परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यात दाखल झाला खंडणीचा गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: July 31, 2021 00:02 IST

ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरु वारी आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देक्रिकेट बुकीसह दोघांची तक्रारतत्कालीन उपायुक्त दीपक देवराज यांचाही आरोपींमध्ये समावेश

ठाणे : ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरु वारी आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गेले दोन दिवस तक्रारदाराचा जबाब नोंदविल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणेनगर पोलिसांनी यामध्ये परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आदी अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयातच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. परमबीर यांच्याच आदेशाने प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन साडे तीन कोटी रु पये उकळल्याचा गंभीर आरोप क्रि केट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी केला होता. हा सारा प्रकार ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयातच घडल्याने ठाणेनगर पोलिसांनी फिर्यादींचा जबाब नोंदवण्याचे काम गुरु वारी हाती घेतले होते. यातील जाब जबांसह अनेक पुरावेही पोलिसांना दिल्याचे सोनू जालान याने दावा केला. यामध्ये संजय पुनामिया, विकास दाभाडे, रवी पुजारी, विमल अग्रवाल, बरखा अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश शाह आणि मुजावर आदी खासगी व्यक्तींचाही समावेश आहे.

मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करु न त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी एक कोटी १८ लाखांची मागणी करुन सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी या तक्रारीमध्ये केला आहे.

पोलिसांची पंचाईत-आपल्याच माजी पोलीस आयुक्ताविरुद्ध खंडणीसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे एकामागून एक दाखल होत असल्याने ठाणेनगर पोलिसांसह पोलीस उपायुक्तांपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत अनेक पोलीस अधिकाºयांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन घेण्याचे किंवा याबाबत माहिती देण्याचे टाळले. विशेष म्हणजे यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातही परमबीर सिंग यांच्यासह कोणत्याही आरोपीचे नाव येणार नाही, याचीही पोलिसांनी पद्धतशीरपणे काळजी घेतली. शिवाय, कोणताही अधिकारी यावर भाष्य करणार नाही, असेही बजावण्यात आल्याने ठाणेनगर पोलिसांसह सर्वच अधिकाºयांची याबाबत काय माहिती द्यायची, याबाबत चांगलीच पंचाईत झाल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी