=====================================================================================================
भिवंडीत घरफोडी
भिवंडी : भिवंडीत चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच अनोळखी व्यक्तीने बाळा कम्पाउंड येथे राहणारे महंमद नौशाद वकील अहमद फारुकी यांच्या घराचा काडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमधील ६२ हजार ७०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी फारुकी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
=====================================================================================================
घर मालकावर हल्ला
भिवंडी : भाड्याचे राहिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या खोली मालकावर भाडेकरूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री शहरातील हंडी कम्पाउंड येथे घडली. या प्रकरणी खोली मालकाने भोईवाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर भाडेकरूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरशद मो. हासिम अंसारी (२७) असे घर मालकाचे नाव असून, सलीम रिक्षावाला असे हल्लेखोराचे नाव आहे. सलीमकडे भाड्याचे शिल्लक राहिलेले पैसे मागण्यासाठी अरशद गेला असता सलीमने पैसे देण्यास नकार देत हल्ला केला. =====================================================================================================
भिवंडीत वीज चोरी
भिवंडी : टोरंट पॉवर कंपनीने वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला असून १ लाख ६७ हजारांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अरशद मोहंमद हसन अंसारी व मोहमद शाहीद मोहमद हसन अंसारी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी वीज मीटरचे सील तोडून कॉपर लिंक लावून १ लाख ६७ हजार ९३७ रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले.