'त्या' १० मजली इमारतीची फाइल पालिकेतून गायब, केडीएमसीत सावळा गोंधळ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:05 IST2026-02-25T12:02:31+5:302026-02-25T12:05:03+5:30

युसूफ हाइट्स या इमारतीच्या फाईलची माहिती निसार शेख यांनी माहिती अधिकारात महापालिकेकडे मागितली होती.

File of 'that' 10-storey building missing from the municipality, chaos in KDMC; Case registered at the police station | 'त्या' १० मजली इमारतीची फाइल पालिकेतून गायब, केडीएमसीत सावळा गोंधळ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

'त्या' १० मजली इमारतीची फाइल पालिकेतून गायब, केडीएमसीत सावळा गोंधळ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात मौलवी कम्पाउंडजवळ उभारलेल्या युसूफ हाइट्स या १० मजली बेकायदा इमारतीची फाईल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभिलेख विभागातून गायब झाली आहे. या प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर अडके यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

युसूफ हाइट्स या इमारतीच्या फाईलची माहिती निसार शेख यांनी माहिती अधिकारात महापालिकेकडे मागितली होती. ती देण्यासाठी महापालिकेने शोधाशोध सुरू केली त्यावेळी हा प्रकार उघड झाला. 

फाईल महाराष्ट्राबाहेर नेली असावी किंवा नष्ट केली असावी, असा संशय तक्रारीद्वारे महापालिका प्रशासनाने व्यक्त केला. बाजारपेठ पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गायब झालेल्या फाईलप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण ? 

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार, मौलवी कम्पाउंडनजीक बेघरांसाठी ३७६ चौरस मीटरचा भूखंड आरक्षित आहे. त्याच्याबरोबर ११५ चौरस मीटरचा भूखंड खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित आहे. 

दोन्ही आरक्षित भूखंडांवर युसूफ हाइट्स इमारत उभी केली आहे. २०१२ ते २०१४ या कालावधीत हा प्रकार घडला. जमीनमालक असमत मौलवी आणि कुलमुखत्यारधारक सलमान डोलारे यांनी मिळून इमारत विकसित केली. 

बिल्डरने त्याच्या साथीदाराच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली. महापालिकेला बनावट आराखडा सादर केला तसेच ओसीसुद्धा तयार केली. महापालिकेची परवानगी मिळविली असल्याचे भासविले.

१० जणांची कोट्यवधींची गुंतवणूक

युसूफ इमारतीत १० जणांनी गुंतवणूक केली. त्यांच्याकडून १ कोटी ८२ लाख रुपये उकळले. त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी दोन वर्षांपूर्वी बाजारपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

बिल्डर सलमान डोलारे फरार आहे. याच प्रकरणातील बेकायदा इमारतीची फाईल गहाळ झाल्याने बिल्डरला वाचविण्याकरिता फाईल गायब केल्याचा संशय आहे.

Web Title : केडीएमसी से गायब अवैध इमारत की फाइल; पुलिस में शिकायत दर्ज

Web Summary : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका से अवैध 10 मंजिला इमारत, युसूफ हाइट्स की फाइल गायब हो गई। शिकायत के बाद पुलिस ने मामला दर्ज किया। इमारत आरक्षित भूमि पर जाली दस्तावेजों से बनाई गई थी। धोखाधड़ी का मामला पहले ही दर्ज है, और बिल्डर फरार है।

Web Title : Illegal Building File Vanishes from KDMC; Police Complaint Filed

Web Summary : File of an illegal 10-story building, Yusuf Heights, disappeared from Kalyan-Dombivli Municipal Corporation. Police filed a case after a complaint. The building was built on reserved land with fraudulent documents. A fraud case was already registered, and the builder is absconding.