‘File chargesheet after victim's argument’, Jitendra Awhad bungalow assault case | ‘पीडिताच्या युक्तिवादानंतर दोषारोपपत्र दाखल करा’, जितेंद्र आव्हाड बंगला मारहाण प्रकरण

‘पीडिताच्या युक्तिवादानंतर दोषारोपपत्र दाखल करा’, जितेंद्र आव्हाड बंगला मारहाण प्रकरण

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका सिव्हिल इंजिनीयरला मारहाण केल्याप्रकरणी ९ जुलैपर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांना दिले. तसेच पीडित व्यक्तीचा युक्तिवाद पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा, असेही निर्देश दिले.
अनंत करमुसे यांनी आव्हाड यांचे मॉर्फ फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याचा आरोप करत एप्रिलमध्ये करमुसे यांना १० ते १५ जणांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण केली. आव्हाड यांना या प्रकरणी आरोपी करून तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची करमुसे यांची मागणी आहे.पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे शुक्रवारी सांगितले. त्यावर करमुसेंच्या वकिलांनी आपल्याला युक्तिवाद पूर्ण करू दे; मगच आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश द्या, अशी विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत पुढील सुनावणी ९ जुलै रोजी ठेवली.

Web Title: ‘File chargesheet after victim's argument’, Jitendra Awhad bungalow assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.