भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 20:16 IST2021-08-05T20:16:41+5:302021-08-05T20:16:54+5:30

घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Fierce fire at paper warehouse in Bhiwandi | भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

भिवंडी ( दि. ५ ) भिवंडीत गोदामांसह यंत्रमाग कारखान्याला आई लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अशातच एका पेपरचा साठा असलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना दापोडा ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड तेथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे. आर के इंटरप्रायजेस असे आग लागलेल्या पेपर कंपनीचे नाव असून या ठिकाणी पेपर निर्मिती व गोदाम एकाच ठिकाणी होते. 

घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीचे कारण अजून समजले नसून लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या आगीच्या घटनेची नोंद नारपोलीपोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Web Title: Fierce fire at paper warehouse in Bhiwandi