मीरारोडच्या नया नगरमध्ये आढळले अर्धवट मातीत पुरलेले स्त्री अर्भक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 22:59 IST2018-02-11T22:57:26+5:302018-02-11T22:59:52+5:30
मीरारोडच्या नया नगर भागातील मातृछाया इमारतीच्या आवारात अर्धवट गाडलेलं नवजात मुलीचं अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोडच्या नया नगरमध्ये आढळले अर्धवट मातीत पुरलेले स्त्री अर्भक
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागातील मातृछाया इमारतीच्या आवारात अर्धवट गाडलेलं नवजात मुलीचं अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे समांतर मार्गावर असलेल्या मातृछाया या इमारतीच्या आवारात शनिवारी सायंकाळी मुलं खेळत होती. त्यावेळी झाडा जवळ मातीच्या वर आलेला नवजात बाळाच्या शरीराचा काही भाग दिसुन आला. सदर प्रकार मुलांनी घरच्यांना सांगीतल्यावर इमारतीच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी नया नगर पोलीसांना कळवले असता उपनिरीक्षक मेघा राणे ह्या पोलीस पथकासह आल्या. अर्भकाचा मृतदेह मातीतुन बाहेर काढला असता तो मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले. नवजात स्त्री अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मुलगी आहे म्हणुन नवजात अर्भकाची हत्या केली असावी असा संशय असुन परिसरातील संबंधित रहिवाशाचे कृत्य असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
नया नगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु आहे. पोलीस तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगीतले.