शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 05:48 IST

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या रिंकू यादवने शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील निवासी डॉक्टर धनश्री केळकर यांना मारहाण केली.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या रिंकू यादवने शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील निवासी डॉक्टर धनश्री केळकर यांना मारहाण केली. याप्रकरणी रिंकूविरोधात गुन्हा दाखल झाला. रिंकूच्या हाताला आयव्ही लावली असताना, ती काढून रिंकू वॉर्डमधून सारखी बाहेर येजा करत होती. डॉक्टर केळकर यांनी बाहेर जाऊ नको, असे तिला म्हटले. त्याचा राग मनात धरून आणि प्रसूतिकळांच्या त्रासातून तिने केळकर यांना मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करून आयव्ही लावले होते. मात्र, प्रसूतिवेदना होत असल्याने तिची चिडचिड वाढली होती. अशातच, ती आयव्हीची सुई काढून बाहेर येजा करत होती. त्यावेळी त्या वॉर्डमध्ये निवासी डॉक्टर धनश्री केळकर इतर रुग्णांची तपासणी करत होत्या. त्यांनी तू बाहेर जाऊ नकोस. आपण तुझी तपासणी करून पुढे निर्णय घेऊ, असे त्यांनी तिला सांगितले. त्यावेळी वेदनांनी त्रासलेल्या रिंकूने केळकर यांना लाथ मारल्याने तेथील बेसीन त्यांच्या डोक्याला लागले. तसेच रक्तदाब तपासणी करण्याची मशीन नाकाला लागल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर रिंकू पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिची समजूत काढून तिच्यावर उपचार सुरू ठेवल्याचे कळवा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. अशा घटना यापुढे घडू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने वॉर्डमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. केळकर यांच्या तक्रारीनुसार रिंकूविरोधात गुन्हा दाखल झाला.>प्रसूतिकक्षात महिला सुरक्षारक्षक नेमणारही दुर्दैवी घटना आहे. या घटनेनंतरही रुग्ण रिंकूची काळजी घेतली जात आहे. जखमी डॉक्टर केळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा प्रकार प्रसूतिकळांमुळे रुग्णाला चिडचिड झाल्याने घडला असावा. अशा घटना भविष्यात होऊ नये, यासाठी प्रसूतिकक्षात एक महिला सुरक्षारक्षक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- संध्या खडसे, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा>या घटनेनंतर डॉक्टर केळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण करणे, यासारख्या कलमान्वये रिंकू यादव हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर केळकरांच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.- शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे