शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

...भय इथले संपत नाही!, कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 5:29 AM

कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा : अडथळे पार करताना जीव टांगणीला

कल्याण : रेलिंग तुटलेल्या कल्याणच्या स्कायवॉकवरून पडून बबलू तलर हा दृष्टिहीन पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मे महिन्यात घडली होती. मात्र, त्यानंतरही तुटलेले रेलिंग, गायब झालेले संरक्षक बार आणि तुटलेल्या लाद्या बसवण्यासाठी केडीएमसीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे स्कायवॉकवर अपघाताचा धोका कायम आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यातून सुटका करण्यासाठी २०१०-११ मध्ये पश्चिमेत स्कायवॉक उभारण्यात आला. एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकची जबाबदारी सध्या केडीएमसीवर आहे. स्कायवॉक रेल्वेच्या पुलाला जोडून असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा वापर करतात. या स्कायवॉकमुळे फेरीवाल्यांचा त्रास वाचेल, तसेच कोंडीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, फेरीवाल्यांनीच स्कायवॉकवर ठाण मांडल्याने पादचाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. याला सर्वस्वी केडीएमसी कारणीभूत असली तरी काहीअंशी फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करणारे नागरिकही या परिस्थितीला जबाबदार आहेत. फेरीवाल्यांच्या कचºयामुळे याठिकाणी आगीच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत.फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबरच भिकारी, गर्दुल्ल्यांच्या उपद्रवामुळे प्रवाशांना रात्री उशिरा जीव मुठीत धरून येजा करावी लागते. फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ले यांच्यामुळे स्कायवॉकला बकाल स्वरूप आले आहे. केडीएमसीकडून स्वच्छतेचे धडे दिले जातात. मात्र, स्वत:च्या स्कायवॉकवर जमा होणाºया कचºयाची कधी गंभीर दखल घेणार, असा सवालही नागरिक करत आहेत. स्कायवॉक परिसरात वारांगनांचाही वावर असतो. मात्र, स्थानिक महात्मा फुले चौक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.स्कायवॉकवरील संरक्षक बार व रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहेत. मे महिन्यात अपघात घडूनही केडीएमसीला घटनेचे गांभीर्य नसल्याचे सद्य:स्थिती पाहता स्पष्ट होते. स्कायवॉकच्या जिन्याचा भाग ओबडधोबड झाल्याने पाय घसरून अथवा तोल जाऊन गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. येथील तुटलेल्या लाद्यांमुळेही काही पादचारी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ‘स्कायवॉकवरून चालताय, पण जीव सांभाळून’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.निविदेचे काय झाले?च्मे महिन्यातील घटनेनंतर स्कायवॉकच्या दुरुस्तीचे काम केले जाणार होते. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त गोविंद बोडके यांनी मान्यता दिल्याची तसेच दुरुस्ती कामाची निविदा काढल्याची माहिती तत्कालीन शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली होती.च्परंतु, अजूनही या कामाला मुहूर्त मिळाला नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. यासंदर्भात बोडके यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण