शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

फडणवीस मुख्यमंत्री नसून 'मॉडेल', कन्हैय्या कुमारची देवेंद्रांवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:11 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : आजचे राजकीय वातावरण योग्य नाही, केंद्रीय संस्थांचा वापर पक्षाच्या हितासाठी केला जातोय.

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी, कन्हैय्या कुमार यांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवली. शरद पवार आणि कन्हैय्या यांच्यातही यावेळी चर्चा झाली. आव्हाड यांच्या अर्ज भरतेवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैय्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री नसून मॉडेल आहेत, अशी टीपण्णी त्यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मॉडेल स्वरुपातील फडणवीस यांचे जुने फोटो व्हायरल झाले होते.

आजचे राजकीय वातावरण योग्य नाही, केंद्रीय संस्थांचा वापर पक्षाच्या हितासाठी केला जातोय. जो भ्रष्ट आहे तो भाजपात गेली की सदाचारी कसा काय होतो. जेव्हा शेतकरी आत्महत्या दुष्काळ याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असता, ते फोटोशूट करण्यात व्यस्त होते. असं वाटत होतं, जणू महाराष्ट्राने मुख्यमंत्री निवडला नसून मॉडेल निवडला आहे, असे म्हणत मार्क्सवादी पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. भाजपाला याबाबत प्रश्न विचारले असता, त्यांचे नेते उत्तर देतात की, मग दुसरा चेहरा कोण? विरोधकांकडे कुणी दुसरा चेहरा आहे का?. मुख्यमंत्री स्वत:ला स्मार्ट दाखविण्याचा प्रयत्न करतात, असे म्हणत कन्हैय्या यांनी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांवर टीका केली. तसेच, महाराष्ट्रात जे लढण्याचे स्पिरीट आहे, ते संपवले जात असल्याचा आरोपही कन्हैय्या यांनी केला. महाराष्ट्रात विधानसभेत सेक्युलरचा आवाज फक्त जितेंद्र आव्हाड हेच आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ठाण्यात आलोय, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचं कौतुक कन्हैय्या यांनी केलयं.  

देश वाचवायचा असेल तर पुरोगामी विचार आत्मसात करावे लागतील. जगाने काल गांधी जयंती साजरी केली. पण, ट्विटरवर गोडसे अमर रहे ट्रोल होतय, याची लाज वाटली पाहिजे. निवडणूकीच्या वेळेस जाती अन् भाषेचं इमोशनल कार्ड चालवले जाते. मात्र, कांदा लोकांना रडवतोय त्यामुळे लोकांनी लक्षात ठेवावे. पंतप्रधान निवडणुकांच्या आधी अच्छे दिन बोलायचे आज बोलतायेत का? कारण त्यांना माहितीये मार्केटिंग कशी करायची, असे म्हणत कन्हैय्या यांनी नरेंद्र मोदींवरही टीका केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkanhaiya kumarकन्हैय्या कुमारthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019kalwaकळवाmumbra-kalwa-acमुंब्रा कलवा