शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

पालघर जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबची तपासणी, जिल्ह्यात एक मेडिको 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 00:05 IST

Palghar district : पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.

- हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे; मात्र तरीही रुग्णवाढ होऊ नये यासाठी प्रशासन अद्यापही काळजी घेताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी आयसीएमआरने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या एकमेव मेडिकोव्यतिरिक्त मुंबईच्या जे.जे. रुग्णालय आणि केईएम रुग्णालयातून एकूण ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबच्या तपासणी केल्या आहेत.पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये सर्वाधिक ३० हजारांहून जास्त रुग्ण वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये आढळले आहेत. यानंतर पालघर तालुक्यामध्ये ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर डहाणूमध्ये २ हजार १९७, जव्हारमध्ये ६२१, मोखाडामध्ये २८७, तलासरीमध्ये २७५, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३६६, विक्रमगडमध्ये ५९९, वाडामध्ये १ हजार ८७९ रुग्ण आढळलेले आहे. जिल्ह्यात आजवर ४५ हजारांहून जास्त रुग्ण आढळले असले तरी ४४ हजारांहून जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर जिल्ह्यातील बव्हंशी व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले आहेत,  मात्र अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. स्वॅब घेण्यासाठी तसेच अन्य बाबींसाठी शासन पातळीवरून, जिल्हाधिकारी आणि आयसीएमआरकडून निधी प्राप्त झाला होता. दरम्यान, आता कोरोना नियंत्रणात असल्याने जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. 

लॅबचे पुढे काय?लॅब पुढेही चालू राहणार आहेत. कारण आता रुग्णसंख्येत पुन्हा वाढही होत आहे. कोरोना स्वॅब टेस्टिंगसाठी प्रत्येक जिल्ह्यात लॅब उभारण्यात आल्या आहेत. त्यात मेडिको (मेडिकल सुविधा आधीपासून असलेले उदा. वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय) आणि नॉन मेडिको (मेडिकल सुविधा आधी नसलेले उदा. विद्यापीठ) असे दोन प्रकार आहेत.

स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मुंबईलाकोरोनाकाळात पालघर जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे स्वॅब घेऊन ते मुंबईला पाठवले जात होते. त्यामुळे त्या स्वॅबचा अहवाल येण्यासाठी एक दिवसाचा अवधी जात होता. यामुळेही नाराजी व्यक्त होत होती. 

एकाही रिपोर्टमध्ये क्युरी नाहीग्रामीण भागातील रिपोर्टमध्ये क्युरी नव्हत्या, मात्र सुरुवातीच्या काळात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रिपोर्टबाबत निगेटिव्हचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याच्या तक्रारी होत्या. यावर महानगरपालिका प्रशासनाने काही लॅबला नोटिशीही बजावल्या होत्या. 

१० जणांचा स्टाफकोरोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाने लॅबमध्ये ८ ते १० जणांच्या स्टाफची नियुक्ती केली होती. 

टॅग्स :palgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस