उल्हासनगरात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आठवणींनी कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 21:12 IST2026-02-01T21:09:11+5:302026-02-01T21:12:29+5:30

राजकीय मतभेद बाजूला ठेवून उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी दादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

Emotional tributes paid to Ajitdada by all parties in Ulhasnagar; Memories brought tears to the eyes of the workers | उल्हासनगरात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आठवणींनी कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे

उल्हासनगरात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आठवणींनी कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे

उल्हासनगर: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर येथील सिंधूभवन हॉलमध्ये आयोजित शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी दादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

उल्हासनगर कॅम्प नं-३, सपना गार्डन येथिल सिंधुभवन हॉल मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांनी अजित दादा यांच्या शोकसभेचे शनिवारी आयोजन केले होते. बहुतांश नेत्यांच्या आठवणी आणि भावना व्यक्त केल्या. या शोक सभेला भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. महापौर अश्विनी निकम यांनी मी जेव्हा १० वीत होते आणि चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते, तेव्हा पिंपरी-चिंचवड येथे खुद्द दादांच्या हस्ते मला सायकल देण्यात आली होती," अशी भावूक आठवण त्यांनी यावेळी सांगितली. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांनी दादांच्या कामाच्या आठवणी सांगताना त्यांचे मन भरून आले आणि त्यांना भरसभेत रडू कोसळले. 

आमदार कुमार आयलानी आणि माजी आमदार पप्पू कलानी यांनी देखील अजित पवार यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि त्यांच्या रोखठोक स्वभावाचे कौतुक करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या सभेला आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलाणी, महापौर अश्विनी निकम, रोहित साळवे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस), राजेश वधारिया (जिल्हाध्यक्ष, भाजप), बंडू देशमुख (जिल्हाध्यक्ष, मनसे) यांच्यासह प्रदीप रामचंदानी व इतर नगरसेवक उपस्थित होते.

Web Title : उल्हासनगर में अजित दादा को श्रद्धांजलि; यादें बनीं नम आँखें

Web Summary : उल्हासनगर में अजित पवार को भावभीनी श्रद्धांजलि दी गई, जिसमें विभिन्न दलों के नेताओं ने यादें साझा कीं। भाजपा, कांग्रेस, शिवसेना और मनसे के नेता शामिल हुए, पवार की कार्यशैली को याद किया। भावनात्मक श्रद्धांजलि में उनके प्रशासनिक कौशल और सीधे स्वभाव पर प्रकाश डाला गया, जिससे उपस्थित लोगों की आंखें नम हो गईं।

Web Title : Ulhasnagar Pays Tribute to Ajit Pawar; Memories Bring Tears

Web Summary : A heartfelt memorial for Ajit Pawar in Ulhasnagar saw leaders across parties sharing memories. Leaders from BJP, Congress, Shiv Sena, and MNS attended, recalling Pawar's work ethic. Emotional tributes highlighted his administrative skills and straightforward nature, moving attendees to tears.