शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:29 IST

‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अश्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भंडारा शहरासह जिल्ह्यातील गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शहरातील वैनगंगा नदीच्या तिरावर बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी वैनगंगा नदीसह जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात शांततेत विसर्जन : गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अश्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भंडारा शहरासह जिल्ह्यातील गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शहरातील वैनगंगा नदीच्या तिरावर बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी वैनगंगा नदीसह जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या बाप्पाला अनेकांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. वैनगंगा नदीत विसर्जनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत भावीक बाप्पाला घेवून येत होते. सार्वजनिक आणि घरगुती गणेशांची मिरवणुक वैनगंगेच्या तिरावर पोहचताच त्याठिकाणी आरती करुन बाप्पाला निरोप दिला जात होता. पुरुषांसोबतच महिला आणि लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. दुपारी ४ नंतर विसर्जन करण्यासाठी वैनगंगा तिरावर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जुन्या वनउपज नाक्याजवळ बॅरिकेट्स लावून वाहने अडविण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना बाप्पाला आपल्या डोक्यावरुन वैनगंगेपर्यंत न्यावे लागत होते. विशेष म्हणजे बॅरिकेटपासून वैनगंगेच्या पात्रापर्यंत असलेल्या मार्गात प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधारातून भाविक जात होते.
कोणतीही अप्रीय घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तासह इलेक्ट्रानिक्स बोट, पट्टीचे पोहणारे कर्मचारी, हवेने भरलेले रबरी टयूब आदी व्यवस्था करण्यात आली होती. शहरात विसर्जन मिरवणूकीदरम्यान कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे भंडाराचा राजा आणि गणेशपूरचा राजा या मंडळाचे विसर्जन पोलिसांनी ठरवून दिलेल्या दिवशी होणार आहे.
भंडारा शहरात सोबतच जिल्ह्यातही बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पवनी शहरात विठूमाई गणेश मंडळ, मंगलमुर्ती गणेश मंडळ, प्रगती गणेशउत्सव मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, प्रियदर्शनी गणेशउत्सव यासह अनेक घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, मोहाडी आदी तालुक्यासह गावागावात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
डीजेवर बंदीने तरुणाईचा उत्साह कमी
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत डीजेवर थिरकणाऱ्या तरुणाईचा उत्साह यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसून आला नाही. न्यायालयाच्या निर्णयाने डीजेवर बंदी घातल्याने जिल्ह्यातील कोणत्याच मंडळाने डीजे लावला नाही. पारंपारिक वाद्य आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. परंतु डीजे नसल्याने उत्साही तरुणांईच्या आनंदावर विरजन पडल्याचे दिसत होते. अनेकजण डीजे नसल्याने या मिरवणुकीतही सहभागी झाले नसल्याचे दिसत होते.