शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

अधिसुचना काढली नसतांना क्लस्टरचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आलाच कसा, गावठाण कोळीवाड्यांचा पुन्हा प्रशासनाच्या विरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 4:56 PM

क्लस्टरमधून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. असे असतांना महापालिकेने त्या आशयाचे क्लस्टरचे प्रस्ताव महासभेत आणले आहेत. त्यामुळे याविरोधात आंदोलनचा इशारा कोळी बांधवांनी दिला आहे.

ठळक मुद्देसमाजाच्या बाजूने उभे न राहिल्यास पुन्हा नगरसेवक होऊ देणार नाहीलॉंग मार्च काढला जाणार

ठाणे - राज्य सरकारकडून अद्याप क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाणे परिसर वगळण्याबाबत अधिसुचना काढण्यात आलेली नाही. तसेच या भागांचे सीमांकन अद्याप निश्चित करण्यात आले नसतांनासुध्दा ठाणे महापालिकेने कोणत्या आधारे क्लस्टर योजनेतून हा परिसर वगळा असा सवाल आगरी कोळी भुमीपुत्र महासघांने केला आहे. एकूणच या योजनेसह भुसंपादन, खाडी किनारी मार्ग, मेट्रो कास्टींग यार्ड, कांदळवन नष्ट करणे अशा विविध प्रकल्पांमुळे स्थानिक भुमिपुत्रांवर अन्याय होत असल्याचा आरोप महासंघाने केला असून या विरोधात १९ डिसेंबरला लॉँग मार्च काढून एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचे महासघांने स्पष्ट केले.                          येत्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत महापालिका प्रशासनाच्या वतीने पाच भागांमध्ये क्लस्टर राबविण्या संदर्भातील प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात या भागातील गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळेच आता या प्रस्तावाच्या विरोधात गावठाण आणि कोळीवाडे एकत्र आले असून त्यांनी या विरोधात आवाज उठविण्याचे निश्चित केले आहे.बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजीवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमीनी औद्योगिक प्रयोजनाकरीता घेण्यात आल्या. त्यासाठी काही शेतकºयांना अत्यल्प मोबदला तर काहींना मोबदलाच देण्यात आला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मुळ मालक असलेल्या शेतकºयांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली जात नसल्याचा आरोप पुंडलीक वाडेकर यांनी सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाण परिसर वगळण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तरीही या योजनेविरोधात नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रक्रि या पालिकेने सुरु च ठेवली आहे, असा आरोपही त्यांनी केला. गावांचे सिमांकन आणि गावठाण विस्तारही झालेला नसून मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे सिमांकन लवकर करण्याची मागणी त्यांनी केली. कोस्टल रोड, मेट्रो कास्टींग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडी किनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील राबोडी भागातील पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लाँग मार्च काढण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे, घोडबंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबई या भागातील भुमिपुत्र सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.             क्लस्टर योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने त्यासंबंधीचे प्रस्ताव सर्वसाधारणे सभेसमोर मान्यतेसाठी सादर केले आहेत. त्यामुळे आगरी-कोळी समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आता समाजाच्या बाजुने उभे राहिले नाहीतर ते पुन्हा लोकप्रतिनिधी नसतील, असा इशारा महासंघाच्या प्रतिनिधीनी गिरीष साळगावकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त