शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी तोडण्याचे आदेश , आयुक्तांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:45 IST

केडीएमसीच्या हद्दीत असलेल्या ४७३ धोकादायक इमारतींपैकी २८२ इमारती अतिधोकादायक आहेत.

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीत असलेल्या ४७३ धोकादायक इमारतींपैकी २८२ इमारती अतिधोकादायक आहेत. यातील काही इमारतींत अद्याप नागरिक राहत असून काहींमध्ये दुकाने सुरू आहेत. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.महापालिका आयुक्त बोडके यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत १९१ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश आयुक्त बोडके यांनी मे महिन्यात दिले होते. धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याचे प्रमाणपत्र महापालिकेच्या प्रभाग अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे सूचित केले होते. अतिधोकादायक इमारतींमध्ये काही ठिकाणी नागरिकांनी अद्याप राहत आहेत, तर काही इमारती या रस्त्यालगत असल्याने तळ मजल्यावरील दुकाने सुरू आहेत. महापालिका मुख्यालयासमोरच अतिधोकादायक इमारत असून तेथे लॉज, दवाखाने, बँक सुरू आहे. या इमारतीला महापालिकेने भली मोठी नोटीस लावूनही त्याकडे इमारतधारकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अतिधोकादायक इमारत कोसळल्यास दुकानदारासह दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांचा जीव जाऊ शकतो. अतिधोकादायक इमारतींची वीज खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.महापालिका आयुक्तांनी ५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या सरकारच्या निर्णयाचा आधार घेत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी खंडित करण्याचा विषय महापालिकेच्या अखत्यारीत असल्याने पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांना दिले आहेत. ३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतधारकांनी त्यांची इमारत वास्तव्यास योग्य आहे का, याचे प्रमाणपत्र महापालिकेच्या बांधकाम विभाग अभियंत्याकडून मिळवून घ्यावे. ज्यांनी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतलेले नाही, त्या इमारतींची पावसाळ्यात पडझड होऊ न दुर्घटना घडल्यास त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही, असे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच सूचित केले आहे.भाडेकरूव्याप्त इमारत असेल तर तिला पुनर्विकासासाठी मंजुरी दिली जाते. त्यातही मालक, भाडेकरूआणि बांधकाम विकासक यांच्यात एकमत होत नसल्याने अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचे घोडे अडले आहे. भाडेकरूव्याप्त इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास त्यांनाही कोणत्या प्रकारची नुकसानभरपाई देण्याची तरतूद महापालिकेच्या हाती नाही. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा आणि पुनवर्सनाचा प्रश्न महापालिका हद्दीत अद्याप सुटलेला नाही. महापालिका केवळ नोटिसा पाठवून मोकळी होते.२०१५ मध्ये मातृछाया इमारत पडून नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या भाडेकरूंना वाºयावर सोडण्यात आले. त्यानंतर, डोंबिवली पूर्वेतील बिल्वदल इमारत धोकादायक झाली आहे. तेथील भाडेकरू बाहेर पडले असले, तरी त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. नागूबाई निवासच्या भाडेकरूंना तात्पुरते बीएसयूपी योजनेत राहण्याची सोय केली होती. त्यांना १६ लाख रुपयांची नोटीस पाठवली गेली. यावरून महापालिकेने पुनर्वसनाविषयी कायम हात वर केलेले आहेत, हेच उघड होते.क्लस्टर योजनेचे गाजरमहापालिका हद्दीत क्लस्टर योजना लागू करण्याचे घोंगडे सरकारदरबारी भिजत पडले आहे. २०१५ च्या मातृछाया इमारत दुर्घटनेपासून क्लस्टर मंजूर केली जाईल, असे गाजर कल्याण-डोंबिवलीकरांना दाखवले जात आहे. क्लस्टर योजना सामायिक विकास नियंत्रण नियमावलीच्या मंजुरीअभावी जाहीर केली जात नाही. सामायिक विकास नियंत्रण नियमावलीस सरकारकडून मंजुरी दिली जात नाही. या सगळ्या सरकारी चक्रात कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न खितपत पडला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली