शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 24 नोव्हेंबरला; अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 4:34 PM

अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केली आहे.

बदलापूर/अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केली आहे. 24 नोव्हेंबरला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 15 नोव्हेंबर असल्याने आता उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ऑनिवडणूक जाहीर झाल्यावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांची जुळवाजुळव करण्यासाठी अल्प कालावधी मिळाला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ हा संपल्याने या पदासाठी नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेचे नगराध्यक्षपद हे पुढच्या अडीच वर्षाकरिता महिलांना राखीव आहे. तर बदलापूरचे पद हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.दोन्ही पालिकांमध्ये उमेदवारीसाठी शिवसेनेतच रस्सीखेच सुरू आहे. त्यातच जिल्हाधिका-यांनी निवडणुकीची तारीख ज्या पद्धतीने जाहीर केली आहे, त्या पद्धतीमुळे आता उमेदवार निश्चितीसाठी पक्षाकडे अवधी कमी शिल्लक राहिला आहे. 14 नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झाल्यावर लागलीच 15 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक ही 24 नोव्हेंबरला असली तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अल्प कालावधी मिळाल्याने गणिते रचण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.15 नोव्हेंबरला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. वैध उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. तर वैध उमेदवारांपैकी माघार घेणा-या उमेदवारांना 20 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर 24 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता पालिका सभागृहात मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर उपनगराध्यक्षपदाची निवडणूक 24 नोव्हेंबरलाच होणार असून, या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 24 नोव्हेंबरला सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत देण्यात आली आहे.नगराध्यक्षपदाची निवडणूक झाल्यावर उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. वैध उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर 15 मिनिटांनी निवडणूक घेण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होणे ही अपेक्षित बाब असली तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एवढा अल्प कालावधी मिळेल याची कल्पना राजकीय पक्षांना नव्हती. त्यामुळे एका रात्रीत उमेदवार निश्चित करण्याची वेळ आता शिवसेनेसह भाजपावर येणार आहे. अंबरनाथ आणि बदलापुरात भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत असली तरी सत्ताधारी सेनेच्या नाराज गटाला सोबत घेऊन सत्तेची गणिते रचण्याची स्वप्न भाजपा पाहत आहे. त्यामुळे भाजपाच्या या रणनीतीला शिवसेना कशा पद्धतीने उत्तर देणार हे दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.बुधवारी दुपारी भाजपाच्या गोटातून उमेदवारी अर्ज दाखल होतो की नाही याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर अंबरनाथमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार की विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे सांभाळणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. बदलापुरात शिवसेनेच्या दोन गटातच उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या बाजूने कौल देणार यावर बदलापूरच्या पुढच्या राजकारणाची गणिते अवलंबून राहणार आहेत.

टॅग्स :badlapurबदलापूरambernathअंबरनाथ