वृद्धाची ऑनलाईन फसवणूक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: October 12, 2023 19:03 IST2023-10-12T19:03:06+5:302023-10-12T19:03:41+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-२, आवतमल चौक परिसरात राहणारे चंदरलाल माखिजा यांना युरीन पाईपची आवश्यकता असल्याने, त्यांनी गुगलवर सर्च केला.

वृद्धाची ऑनलाईन फसवणूक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगर : गुगलवर युरीन पाईपचा सर्च करीत असतांना पाईपच्या माहितीसाठी एकाने लिंक पाठविली. अज्ञात इसमाने पाठविलेली लिंक ओपन करताच पत्नी बरखा यांच्या बँक खात्यातून ७० हजार रुपये निघाले. ऑनलाईन फसवणूक प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-२, आवतमल चौक परिसरात राहणारे चंदरलाल माखिजा यांना युरीन पाईपची आवश्यकता असल्याने, त्यांनी गुगलवर सर्च केला. त्यावेळी एका अज्ञात इसमाने लिंक पाठविली. या लिंक मध्ये युरीन पाईपची माहिती असावी म्हणून त्यांनी २२ फेब्रुवारी २०२३ रोजी लिंक ओपन केली. त्यावेळी पत्नी बरखा यांच्या बँक खात्यातून प्रथम ५० हजार व नंतर २० हजार असे एकून ७० हजार रुपये कमी झाले. त्यांना हा प्रकार उशिराने माहिती झाल्यावर, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चंदरलाल माखिजा यांचा मुलगा राजेश याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.