भिवंडीत वृद्धाची हत्या; महिलेस अटक

By नितीन पंडित | Updated: January 15, 2024 16:13 IST2024-01-15T16:13:07+5:302024-01-15T16:13:41+5:30

हत्या करणारी महिला ही नात्याने हत्या झालेल्या व्यक्तीची विहीण बाई असल्याची माहिती मिळत आहे.

Elderly killed in Bhiwandi; Woman arrested | भिवंडीत वृद्धाची हत्या; महिलेस अटक

भिवंडीत वृद्धाची हत्या; महिलेस अटक

भिवंडी: भिवंडी कल्याण रस्त्यावरील एका लॉज मध्ये ५२ वर्षीय महिलेने ६४ वर्षीय वृध्द व्यक्तीची हत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. हत्या करणारी महिला ही नात्याने हत्या झालेल्या व्यक्तीची विहीण बाई असल्याची माहिती मिळत आहे.

         कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील कॉस्मो लॉजींग अँड बोडींगच्या पहिल्या मजल्यावरील रूम मध्ये शनिवारी शगुप्ताबेगम रफिक बेग ऊर्फ शबीना वय ५२ वर्षे ही महिला आपले व्याही दस्तगीर अल्लाबक्ष शेख वय ६४ वर्षे दोघे रा.खाडीपार, खोणी यांच्या सोबत रात्री १० वाजता गेली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांच्यात प्रॉपर्टीच्या वादातून भांडण झाले. त्यामध्ये शगुप्ताबेगम हिने धारदार शस्त्राने दस्तगीर शेख याच्या गळा व पोटावर वार करून त्याची हत्या केली.

        याबाबतची माहिती लॉज मॅनेजर रविंद्र ऐतप्पा शेट्टी यांच्या लक्षात येताच त्यांनी कोनगाव पोलिसांना घटनास्थळी बोलावले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गंभीर जखमी दस्तगीर शेख यास शासकीय रुग्णालयात हलविले.तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शगुप्ताबेगम विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

       मृत दस्तगीर याची मुलगी हत्या करणारी महिला शगुप्ताबेगम हीची सून असून नात्याने ते दोघे विहीण व्याही आहेत. महिलेस रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.या हत्येच्या गुन्ह्याचा अधिक पोलिस निरीक्षक दीप बने हे करीत आहेत.
 

Web Title: Elderly killed in Bhiwandi; Woman arrested