शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

"राष्ट्रवादी आणि त्यांच्या प्रेम संबंधाचा अंत...", संजय शिरसाटांची संजय राऊतांवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 15:17 IST

खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत असतात.

ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत असतात. याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका केली. संजय राऊत हा राजकारणामधला प्रेम चोपडा आहे. त्यांना काही ना काही बडबड करुन कोणाला नांदू द्यायचं नाही असं दिसतंय. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं पण त्यांनी रमजानमध्ये शीर कुरमा जास्त खाल्ला आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर जास्त इफेक्ट झालेला आहे, अशा शब्दांत शिरसाट यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले.  संजय राऊतांवर बोचरी टीका "ज्याची नसबंदी झालेली असते त्याला मुल होत नाही असे म्हणतात. मात्र, संजय राऊत असा एक चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यानंतरही आम्हाला मुले होईल, असं म्हणणाऱ्यांपैकी आहे. १८ खासदारांपैकी तेरा खासदार निघून गेले पाच राहिले तरी दावा १९ चा करतात हे मूर्खपणाचे जे लक्षण आहे, ते संजय राऊतमध्ये आहे", अशी बोचरी टीका शिरसाट यांनी केली.

तसेच संजय राऊत हा सैराट सारखा पिक्चर काढणार असून राष्ट्रवादी आणि त्यांचे जे प्रेम संबंध चालू आहे, त्याचा अंत सुसाईडमध्ये होणार आणि तो सुसाईड केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर त्यांनी पिक्चर काढले पाहिजे होते, असंही शिरसाटांनी म्हटलं. गजानन कीर्तिकर यांच्याविषयी बोलताना शिरसाटांनी म्हटलं, "जागा वाटपाची प्राथमिक बोलणी सुद्धा सुरू झाली नाही, आमची बोली सुरू होईल त्याच्यानंतर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील." मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं शिरसाटांनी स्पष्ट केलं. 

 

टॅग्स :thaneठाणेSanjay Rautसंजय राऊतSanjay Shirsatसंजय शिरसाटNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना