शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महापौरपदी शिंदेसेना ओमी टीम समर्थक अश्विनी निकम तर उपमहापौरपद भाजपाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:38 IST

महापौर पदासाठी शिंदे सेनेतून राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील, ओमी टीम समर्थक अश्विनी निकम, डिंपल ठाकूर आदी नगरसेवकांची नावे पुढे आली होती.

सदानंद नाईकउल्हासनगर :  महापालिकेच्या महापौर पदी शिंदेसेनेतील ओमी टीम समर्थक अश्विनी निकम यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर  उपमहापौर पदी भाजपचे नगरसेवक अमर लुंड यांनी अर्ज दाखल केला. किती वर्षासाठी महापौर व उपमहापौर पद राहणार याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी सस्पेन्स कायम ठेवला.

उल्हासनगर महापालिकेत शिंदेसेनेने वंचित, साई व अपक्ष नगरसेवकाच्या मदतीने सत्तेसाठीची ४० मॅजिक फिगर गाठली असताना गुरुवारी रात्री भाजप व शिंदेसेनेत बैठक होऊन महायुतीचा निर्णय घेण्यात आला. महायुतीच्या निर्णयानुसार महापौर पद शिंदेसेनेतील ओमी टीमच्या समर्थक अश्विनी निकम व उपमहापौर पदी भाजपाचे अमर लुंड यांचे नावे निश्चित करण्यात आले. त्या दोघांनी महापौर व उपमहापौर नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

वंचित यांची समजूतशिंदेसेनेने वंचित यांना उपमहापौर पदासाठी दिलेला शब्द पाळला नाही. मात्र पुढील टर्म मध्ये उपमहापौर पद देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी दिली. तसेच ऐक स्वीकृत नगरसेवक देणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

महापौर पदासाठी शिंदे सेनेतून राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील, ओमी टीम समर्थक अश्विनी निकम, डिंपल ठाकूर आदी नगरसेवकांची नावे पुढे आली होती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ओमी कलानी यांच्यावर विश्वास टाकत पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेल्या कलानी यांचे कट्टर समर्थक व ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम यांची पत्नी अश्विनी निकम यांची महापौर पदासाठी नाव निश्चित करण्यात आले. निकम यांना महापौर पद म्हणजे कलानी यांच्या घरच्या सारखेच असल्याचे बोलले जात आहे. त्या खेमानी येथील प्रभाग क्रं-६ मधून पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे उपमहापौर पदासाठी पहिल्यांदा निवडून आलेले अमर लुंड यांचे नाव पुढे येऊन अमर लुंड यांची पत्नी कांचन लुंड दोन टर्म नगरसेवक पदी निवडून आल्या होत्या. अमर लुंड त्यांची पत्नी कांचन लुंड, भाऊ शेरी लुंड हे एकाच घरातील तीन जण नगरसेवक पदी निवडून आले आहेत. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena's Ashwini Nikam Mayor, BJP Deputy Mayor in Ulhasnagar

Web Summary : Ashwini Nikam of Shinde Sena is Ulhasnagar's new mayor, supported by the Omi team. BJP's Amar Lund becomes the deputy mayor. The official announcement will be on February 3rd after unopposed nominations.
टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा