वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टीसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 06:41 IST2019-11-03T06:41:17+5:302019-11-03T06:41:23+5:30

१५ मिनिटांनंतर काढले बाहेर; क्षमता चार जणांची

Eight TCs stuck in the elevator of Wagle Depot | वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टीसी

वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टीसी

ठाणे : ठाणे परिवहनच्या वागळे इस्टेट डेपोमध्ये लिफ्टमध्ये आठ तिकीट तपासणीस अडकल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे या लिफ्टची क्षमता चार प्रवासी असतांना तीत आठ जण शिरल्याने ती बंद पाडल्याची बाब समोर आली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

शनिवारी दुपारी ही घटना घडली. वास्तविक पाहता मागील कित्येक वर्षांपासून वागळे डेपोतील लिफ्ट बंद अवस्थेत होती. त्यामुळे तीन तीन मजले पायी जातांना अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे हाल होत होतात. खास करून महिलांचेही हाल होत होते. या संदर्भात वाचा फोडल्यानंतर अखेर सहा महिन्यापूर्वी नवीन लिफ्ट बसविण्यात आली. तिची क्षमता चार जणांची आहे. परंतु, शनिवारी दुपारी २ च्या सुमारास या लिफ्टमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल ८ तिकीट तपासणीस शिरले. यावेळी लिफ्टचा दरवाजा बंद झाला खरा, परंतु क्षमता जास्त असल्याने ती वर जाऊ शकली नाही. शिवाय त्याचे दारही उघडू शकले नाही. १५ मिनिटे हा खेळ सुरू होता. अखेर सुरक्षारक्षकाने चावी आणून दरवाजा उघडून सर्व
तिकीट तपासणीसांना सुखरुप बाहेर काढले.

Web Title: Eight TCs stuck in the elevator of Wagle Depot