शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

मनसैनिकाची आत्महत्या; राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं स्वत:ला पेटवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 9:17 AM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ठाणे - मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने आलेल्या मानसिक तणावामधून ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे. प्रवीण चौगुले हा ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता. दरम्यान, राज ठाकरे यांना  ईडीने नोटीस बजावल्यानंतर प्रवीणने ईडीविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट लिहिल्या होत्या. यासंदर्भात लोकमतने मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ''राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने आपण टेन्शनमध्ये असल्याचे प्रवीणने आपल्या निकटच्या मित्रांना सांगितले होते. तसेच त्याविरोधात टोकाचे पाऊल उचलणार असल्याचेही तो म्हणाला होता. मात्र मित्रांनी त्याला असे न करण्याचा सल्ला दिला होता. पण मंगळवारी रात्री प्रवीण याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली.''प्रवीण चौगुले याने राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटिशीला विरोध म्हणून आत्महत्या केल्याचा दावा मनसैनिकांकडून करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. प्रवीणच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

प्रवीण याने मंगळवारी ईडीविरोधात लिहिलेली फेसबूक पोस्ट 

दरम्यान, ठाण्यातील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच, कळव्यातील रुग्णालयात धाव घेतली. ''ज्यावेळी मला समजलं तसं मी इकडे धावत आलो, तो 85 टक्के भाजला आहे. मी त्याच्या मित्रांशी बोललो, त्यावेळी राज ठाकरेंच्या ईडीप्रकरणामुळे माझी घुसमट होत असल्याचे त्याने म्हटले होते आज दिवसभर तो, याच विचारात होता. हा प्रकार जर याच घटनेमुळे घडला असेल तर, ही खेदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांना, राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगेन की, कुणीही असं कुठलंही कृत्य करू नका. राज ठाकरेंना हे कृत्य कधीही आवडणार नाही. ते या कृत्याला कधीही दुजोरा देणार नाहीत. त्यामुळे कुणीही असे कृत्य करू नये,'' असे आवाहन ठाणे अविनाश जाधव यांनी केलं आहे. 

पक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे

पी. चिदम्बरम अडचणीत; कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता

श्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या!

बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद

२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती

टॅग्स :MNSमनसेSuicideआत्महत्याthaneठाणे