शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

डोंबिवली येथील पासपोर्ट सेवा केंद्रासाठी खा. डॉ. शिंदे यांनी घेतली स्वराज यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 7:05 PM

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर डोंबिवली येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर आता लवकरात लवकर हे केंद्र व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.

ठाणे, दि. ३१ - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर डोंबिवली येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर आता लवकरात लवकर हे केंद्र व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी टपाल खात्याला जागा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले असून जागा उपलब्ध होताच हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही श्रीमती स्वराज यांनी याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांना दिली. गेल्या तीन वर्षांत परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी श्रीमती स्वराज यांनी केलेल्या मदतीबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एमएमआर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण आहे. तसेच, नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन श्रीमती स्वराज यांनी गेल्या महिन्यात डोंबिवली येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे पत्र खा. डॉ. शिंदे यांना पाठवले होते. त्यासंदर्भात खा. डॉ. शिंदे यांनी संसद अधिवेशनादरम्यान श्रीमती स्वराज यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. ५० किमी परिघात एकच पासपोर्ट सेवा केंद्र असावे, असा नियम आहे; मात्र तो डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्राच्या आड येऊ देणार नाही, अशी ग्वाही श्रीमती स्वराज यांनी याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांना दिली. याबाबतचे आदेश तातडीने ठाणे पासपोर्ट कार्यालयाला निर्गमित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. परदेशात गेल्यानंतर तिथे विविध कारणांनी अडकून पडलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांच्या संदर्भात श्रीमती स्वराज यांनी गेल्या तीन वर्षांत तातडीने मदत केली होती. त्याबद्दलही खा. डॉ. शिंदे यांनी श्रीमती स्वराज यांचे आभार मानले. ठाणे येथून नोकरीनिमित्त मलेशियाला गेल्यानंतर तिथे व्हिसा बनावट असल्याचे उघडकीस आल्यामुळे अडचणीत आलेल्या १९ तरुणांनी खा. डॉ. शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. खा. डॉ. शिंदे यांनी त्वरित श्रीमती स्वराज यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर परराष्ट्र खात्याने हस्तक्षेप केल्यामुळे या १९ तरुणांना भारतात परतणे शक्य झाले होते. दोन महिन्यांपूर्वी ट्युनिशियाजवळच्या एका बंदरातील व्यापारी बोटीवर कंपनीच्या मालकाने जबरदस्तीने ताब्यात ठेवलेल्या १९ खलाशांची सुटका देखील खा. डॉ. शिंदे यांच्या विनंतीनंतर परराष्ट्र खात्याने केली होती. तसेच, गेल्याच महिन्यात कल्याणचा एक तरुण नोकरीनिमित्त मलेशिया येथे गेला असता बेपत्ता झाल्याचे आढळल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठीही श्रीमती स्वराज यांनी मदत केली होती. वेळोवेळी तातडीने केलेल्या या मदतीबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी श्रीमती स्वराज यांचे आभार मानले.