शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

‘डी मार्ट’ मॉलच्या बांधकामाला खोडा

By admin | Updated: February 24, 2016 03:05 IST

डोंबिवलीत भोपर येथील प्रायमाटेक्स मशिनरी प्रायव्हेट लिमिडेट या बंद कंपनीच्या कामगारांची थकीत देणी देण्यापूर्वीच कंपनी मालकाने अव्हेन्यू सुपर मार्केटला जागा विकल्याने देणी मिलेपर्यंत

कल्याण : डोंबिवलीत भोपर येथील प्रायमाटेक्स मशिनरी प्रायव्हेट लिमिडेट या बंद कंपनीच्या कामगारांची थकीत देणी देण्यापूर्वीच कंपनी मालकाने अव्हेन्यू सुपर मार्केटला जागा विकल्याने देणी मिलेपर्यंत तेथील बांधकाम रोखण्याची आणि एनओसी रद्द करण्याची मागणी आगरी यूथ फोरमने सहाय्यक कामागार आयुक्तांकडे केली आहे. या जागेवर डी मार्ट मॉल उभारण्याचे काम सुरु आहे. कामगारांच्या मागणीनुसार मॉलच्या बांधकामाला दिलेली एनओसी रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार आयुक्तांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त प्र. ना. पवार यांनी दिली.कामगारांनी मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या दालनात मंगळवारी बैठक घेतली. त्यात एनओसी रद्द करण्याची आणि बेकायदा बांंधकामप्रकरणी एमआरटीपी अ‍ॅक्टअंतर्गत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, अव्हेन्यू सुपर मार्केट कंपनीचे अल्वीन मचारडो, मार्टीस आणि कायदेशीर बाजू पाहणाऱ्या नेहा नायक उपस्थित होत्या. प्रायमाटेक्स ही कंपनी २३ वर्षापूर्वी बंद पडली. तेव्हा त्यात ५४२ कामगार होते. त्यांना कंपनीकडून थकीत देणी मिळाली नव्हती. त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी ४१ कोटींची देणी देणे लागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी तडजोडीची रक्कम म्हणून १५ कोटी रूपये कामगारांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यापैकी २ कोटी ३१ लाख रुपये कामगारांना लाभांशापोटी मिळाले. १३ कोटी रुपये मिळणे बाकी आहे. प्रायमाटेक्स कंपनी मालकाने ही कंपनी लिलावात काढली. ती अव्हेन्यू सुपरमार्केटने घेतली. सहानुभूती म्हणून अव्हेन्यूने ५४२ पैकी १७१ कामगारांना प्रत्येकी ३० हजारांचा धनादेश दिला. कंपनी लिलावात घेतल्याने कामगारांच्या देण्या-घेण्यांशी आमचा संबंंध नाही. १७१ कामगारांना ३० हजार रुपयांचे धनादेश प्रायमाटेक्स संघर्ष कामगार संघटनेच्या मान्यतेनंतरच दिल्याची माहिती कंपनीचे अल्वीन मचारडो यांनी दिली. उर्वरित कामगारांचे काय, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला असता त्याचे दायित्व आमच्याकडे नाही. त्याला आम्ही बांधील नाही, असे मचारडो यांनी स्पष्ट केल्याने कामगार संतप्त झाले.