शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकिरीमुळे क्लस्टर योजनेतून राहिले दूऽऽर!

By admin | Updated: June 11, 2017 03:16 IST

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या महापालिकांनी क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट राज्य सरकारला सादर केला नसल्याने

- मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या महापालिकांनी क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट राज्य सरकारला सादर केला नसल्याने या महापालिका क्षेत्रात धोकादायक व अनधिकृत इमारती असूनही येथे क्लस्टर डेव्हलपमेंट लागू होणार नाही. मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास परिक्षेत्रात (एमएमआर रिजन) ‘क्लस्टर’ योजना राबवण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने लागू केलेली स्थगिती शुक्रवारी उठवली असल्याने ‘क्लस्टर’चा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मुंबई, ठाणे, नवी मुंबई या तीनच महापालिका क्षेत्रांत ही योजना प्राधान्याने राबवली जाणार आहे. कारण, या महापालिकांनी त्यांचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सरकारला सादर केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०१५ सालच्या अहवालानुसार ५८६ धोकादायक इमारती होत्या. ठाकुर्ली येथे धोकादायक इमारत पडून ९ जणांचा मृत्यू झाल्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘क्लस्टर’ योजना राबवू, असे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने क्लस्टरची अंमलबजावणी करता येत नव्हती. यंदाच्या वर्षीही पावसाळ्याच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ५३१ धोकादायक इमारती असल्याची यादी महापालिकेने जाहीर केली. त्यापैकी २०२ इमारती अतिधोकादायक, तर ३२९ इमारती धोकादायक असून त्यात जवळपास ४० हजार लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. न्यायालयीन स्थगिती उठवल्याच्या बातमीने ठाण्यात जल्लोष साजरा करण्यात येत असला तरी केडीएमसी, उल्हासनगर व मीरा-भार्इंदरमध्ये उदासीनता आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार आनंद परांजपे यांनी अहवालाची विचारणा सरकारकडे केली होती. हा रिपोर्ट तयार करत असल्याचेच सांगत आहे. अद्यापही तो तयार नाही. परांजपे म्हणाले की, केवळ ठाणे, नवी मुंबई, मुंबई महापालिका हद्दीत दाट लोकवस्ती व धोकादायक इमारती नाहीत. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर या महापालिका क्षेत्रातही क्लस्टर योजना राबवली पाहिजे. क्लस्टरचा निर्णय लवकर होत नसल्याबद्दल सुनील नायक यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर राजेंद्र देवळेकर म्हणाले की, ‘क्लस्टर’ राबवण्याचा ठराव महापालिकेने केलेला आहे. तसेच माझ्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करण्याकरिता एजन्सी नेमण्यात आली आहे. हा रिपोर्ट दोन महिन्यांत तयार होईल. पालकमंत्रीही पाठपुरावा करत आहेत.